हिमांशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नेहा कक्कर बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात पडली ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 14:37 IST2019-01-26T14:29:54+5:302019-01-26T14:37:52+5:30
गेल्या काही दिवसांपासून नेहा कक्कर तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. हिमांश कोहलीसोबतच्या ब्रेकअपनंतर नेहा अनेक ठिकाणी भावूक झालेली आपण पाहिली आहे

हिमांशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नेहा कक्कर बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात पडली ?
गेल्या काही दिवसांपासून नेहा कक्कर तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. हिमांश कोहलीसोबतच्या ब्रेकअपनंतर नेहा अनेक ठिकाणी भावूक झालेली आपण पाहिली आहे. ‘इंडियन आयडॉल 10’च्या सेटवर एका स्पर्धकाचे गाणे ऐकून नेहा इतकी इमोशनल झाली की, चक्क रडू लागली. यानंतर नेहा कसेबसे स्वत:ला सावरले अन् सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, या वाईट फेजमधून बाहेर पडल्याचे संकेत दिलेत.
नुकताच एका रिअॅलिटी शोच्या परीक्षकाची जबाबदारी नेहा पार पडते आहे. या रिअॅलिटी शोमध्ये काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरने हजेरी लावली होती. यावेळी नेहाने रणबीर तिला आवडत असल्याची कबुली दिली होती. मात्र आपल्या फिलिंगस आपण त्याच्यासमोर कधी व्यक्त केल्या नसल्याचे ती म्हणाली.
एकंदरीत काय तर हिमांशसी ब्रेकअप झाल्यानंतर नेहा रणबीरच्या प्रेमात पडली असल्याचे दिसतेय. नुकतेच एका वेबपोर्टलने नेहाला हिमांशबद्दल विचारले होते. हिमांशचे नाव ऐकताच नेहाने त्याला ओळखण्यास नकार दिला होते. ‘कौन हिमांश...मैं इस नाम के किसी भी शख्स को नहीं जानती हूं,’ असे नेहा म्हणाली होती. कृपया मला एकटे सोडा, अशी विनंतीही नेहाने केली होती. नेहा व हिमांश या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना ‘अनफॉलो’केले आहे. केवळ इतकेच नाही तर नेहाने हिमांशसोबतचे स्वत:चे सर्व व्हिडिओ व फोटो आपल्या सोशल अकाऊंटवरून डिलिट केले आहेत. नेहा व हिमांश दोघेही ‘ओह हमसफर’ या व्हिडिओत एकत्र दिसले होते.