ब्रेकअपनंतर हे काय करतोय नेहा कक्करचा एक्स-बॉयफ्रेन्ड? व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 15:47 IST2020-03-02T15:45:41+5:302020-03-02T15:47:56+5:30
हिमांशचा अनोखा अंदाज

ब्रेकअपनंतर हे काय करतोय नेहा कक्करचा एक्स-बॉयफ्रेन्ड? व्हिडीओ व्हायरल
नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांच्या अफेअरपेक्षा त्यांचे ब्रेकअप अधिक गाजले. होय, म्हणायला वर्षभरापूर्वी या दोघांचे ब्रेकअप झाले. पण या वर्षभरात नेहा सतत ब्रेकअपवर बोलली. हिमांशने वर्षभर मौन बाळगले. पण काही दिवसांपूर्वी त्यानेही तोंड उघडले. ती नॅशनल टीव्हीवर रडली आणि मी विलन झालो, असे तो म्हणाला. त्याच्या या आरोपाने नेहा चांगलीच भडकली आणि तिनेही माझ्या नावाचा वापर बंद कर नाहीतर...अशा शब्दांत त्याची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला. आता नेहाचा एक्स-बॉयफ्रेन्ड त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. होय, इन्स्टाग्रामवर हिमांशने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये हिमांश गायीची सेवा करताना पाहायला मिळत आहे.
इन्स्टाग्रामवर हिमांशने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो गाईला चारा देताना दिसतोय. I'm A cowboy असे कॅप्शन देत हिमांशने हा व्हिडिओ शेअर केला. सध्या हिमांशचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीने नुकतीच बॉम्बे टाइम्सला मुलाखत दिली होती. यावेळी त्याने नेहावर अनेक आरोप केले होते. तो म्हणाला होता, ‘माझ्याकडून हे वाईट ब्रेकअप झाले नव्हतेच. पण चर्चा सुरु झाल्या आणि सगळ्या गोष्टी बिघडायला लागल्या. तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वाधिक वाईट काळ होता. आता मी त्यातून बाहेर आलो आहे. पण त्यावेळी लोकांच्या नजरेत मी विलेन ठरलो. मला सोशल मीडियावर अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले गेले. कुणालाही रिअल स्टोरी माहित नाही आणि तरीही मला सरसकट खलनायक ठरवले गेले. ती टीव्हीवर रडली आणि लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला. सगळा दोष माझ्या माथ्यावर फोडून ती नामनिराळी राहिली. मी सुद्धा बोलावे, असे मला अनेकदा वाटले. पण मी योग्य वेळेची प्रतीक्षा करायचे ठरवले. माझा तो निर्णय अगदी योग्य होता. कारण कालांतराने माझ्या मनातला राग कमी झाला. शेवटी एकेकाळी ज्या व्यक्तिवर मी जीवापाड प्रेम केले, तिच्याविरोधात मी कसा काय बोलू शकतो. ती माझ्या प्रेमाची व्याख्या नव्हती. तू माझ्यासोबत असे का केलेस, हा प्रश्न मी तिला कधीच केला नाही. पण या सगळ्यामुळे मी प्रचंड हर्ट झालो.’