अन् लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाता गाता अचानक रडायला लागली नेहा कक्कड...पाहा व्हिडिओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 16:13 IST2019-01-04T16:13:13+5:302019-01-04T16:13:50+5:30
बॉलिवूड सिंगर नेहा कक्कड सध्या बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहेत. हिमांशसोबतच्या ब्रेकअपनंतर नेहा स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करतेय. ब्रेकअपच्या दु:खातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. पण हे ब्रेकअप पचवणे नेहासाठी खरेच सोपे नव्हते, हे तिचा एक जुना व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते.

अन् लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाता गाता अचानक रडायला लागली नेहा कक्कड...पाहा व्हिडिओ!
बॉलिवूड सिंगर नेहा कक्कड सध्या बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहेत. हिमांशसोबतच्या ब्रेकअपनंतर नेहा स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करतेय. ब्रेकअपच्या दु:खातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. पण हे ब्रेकअप पचवणे नेहासाठी खरेच सोपे नव्हते, हे तिचा एक जुना व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते. तूर्तास नेहाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक रोमॅन्टिक गाणे गाता गाता नेहा अचानक रडायला लागते. काही महिन्यांपूर्वी नेहाचा अहमदाबादेत एक लाईव्ह कॉन्सर्ट झाले. यादरम्यान स्टेजवर गाता गाता नेहाला अश्रू रोखणे कठीण झाले.
येथे जे कुणी बसलेत, त्यांच्यापैकी सगळ्यांनीच आयुष्यात कधी ना कधी प्रेम केलेय. कधी ना कधी प्रेम भंगाचे दु:खही भोगलेय. माझे हे गाणे प्रेमभंग झालेल्यांसाठी आहे, असे म्हणत नेहा ‘तुझे चाहा रब से भी ज्यादा...फिर भी न तुझे पा सके...’ हे गाणे गायला सुरूवात करते. पण हे गाणे गाताना तिच्या आवाज जड होतो आणि ती रडायला लागते. व्हिडिओत अनेकदा ती आपल्या डोळ्यांतील अश्रू टिपताना दिसते.
यानंतर कसेबसे स्वत:ला सांभाळत, ती पुन्हा गाणे सुरु करते. पर्सनल लाईफमध्ये काहीही सुरू असो..पण आज मी तुमच्यासाठी येथे आले आहे. हे गाणे केवळ आणि केवळ तुमच्यासाठी आहे...असे ती म्हणते.
नेहाचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. केवळ पाहिलाचं नाही तर त्यावर भरभरून कमेंट्सही दिल्या आहेत. नेहा डियर, प्लीज स्वत:ला सांभाळ, असा सल्ला अनेकांनी तिला दिला आहे.