Neetu Kapoor Video: नात कोणासारखी दिसते? सांगताना नीतू कपूर यांचा आनंद गगनात मावेना...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 11:21 IST2022-11-07T11:18:06+5:302022-11-07T11:21:03+5:30

Neetu Kapoor Video: प्रसूतीनंतर आलिया सध्या रूग्णालयात आहे. नातीच्या जन्मानंतर नीतू कपूर तिला पाहायला रूग्णालयात पोहोचल्या.

Neetu Kapoor Says Baby Girl And Alia Bhatt Are Ekdum First Class Video | Neetu Kapoor Video: नात कोणासारखी दिसते? सांगताना नीतू कपूर यांचा आनंद गगनात मावेना...!!

Neetu Kapoor Video: नात कोणासारखी दिसते? सांगताना नीतू कपूर यांचा आनंद गगनात मावेना...!!

आलिया भट (Alia Bhatt)आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दोघंही आई-बाबा झाले आहेत. काल रविवारी आलियाने एका गोंडस कन्येला जन्म दिला. घरी लक्ष्मी आल्याने कपूर कुटुंबीयात आनंदाचं वातावरण आहे.
प्रसूतीनंतर आलिया सध्या रूग्णालयात आहे. नातीच्या जन्मानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) तिला पाहायला रूग्णालयात पोहोचल्या. नातीला पाहून घरी परतल्यावर त्यांना पापाराझींनी घेरलं. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रसुतीनंतर आलिया आणि तिच्या बाळाबाबतच्या तब्येतीबाबत त्यांनी माहिती दिली. 

आलिया आणि नात आता कशी आहे? असा प्रश्न पापीराझींनी नीतू कपूर यांना केला. यावर आलिया व तिचं बाळ एकदम छान आहे. दोघींचीही प्रकृती उत्तम आहे, असं नीतू यांनी सांगितलं.
 नात कोणासारखी दिसते? ती रणबीरवर गेलीये की आलियावर? असा प्रश्न पापाराझींनी केला. यावर नीतू गोड हसल्या.  अजून बाळ  खूप लहान आहे. त्यामुळे ती रणबीरसारखी दिसते की आलियासारखी हे सांगणं कठीण आहे, असं त्या हसत हसत म्हणाल्या. नातीच्या जन्मानंतर नीतू कपूर फारच आनंदी दिसल्या. आजी झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने नीतू यांचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

आलियाला काल सकाळी 7.30 वाजता प्रसूतीसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर काही तासांतच तिने मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर आलियाने एक पोस्ट शेअर केली होती. ‘आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी. आमच्या बाळाचा जन्म झाला आणि ही मुलगी कसली जादुई आहे.... आज आम्ही भरभरून प्रेम, आशीर्वाद मिळालेले पालक आहोत. खूप खूप प्रेम...’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
 

Web Title: Neetu Kapoor Says Baby Girl And Alia Bhatt Are Ekdum First Class Video