​ ‘हेराफेरी’चे दिग्दर्शक नीरज व्होरा गत दहा महिन्यांपासून कोमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 10:03 IST2017-08-29T04:33:50+5:302017-08-29T10:03:50+5:30

अभिनेते,दिग्दर्शक, निर्माता अशी ओळख असलेले नीरज व्होरा गेल्या दहा महिन्यांपासून कोमामध्ये आहेत.‘हेराफेरी’,‘चांची 420’ या सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले नीरज ...

Neeraj Vohra director of 'Harafari' has been comatose for ten months! | ​ ‘हेराफेरी’चे दिग्दर्शक नीरज व्होरा गत दहा महिन्यांपासून कोमात!

​ ‘हेराफेरी’चे दिग्दर्शक नीरज व्होरा गत दहा महिन्यांपासून कोमात!

िनेते,दिग्दर्शक, निर्माता अशी ओळख असलेले नीरज व्होरा गेल्या दहा महिन्यांपासून कोमामध्ये आहेत.‘हेराफेरी’,‘चांची 420’ या सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले नीरज व्होरा यांना गतवर्षी १९ आक्टोबरला हार्ट अटॅक आला आणि यानंतर ब्रेन स्ट्रोक आल्याने ते कोमात गेले. एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरु  होते. अलीकडे त्यांचे जवळचे मित्र फिरोज नाडियाडवाला यांच्या ‘बरकत विला’ या बंगल्यात त्यांना हलवण्यात आले आहे. ११ मार्चपासून नादियाडवालांच्या घरातील एका रुमचे रुपांतर आयसीयूमध्ये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रुममधल्या भिंतींवर व्होरांच्या सिनेमांची पोस्टर्स आणि डीव्हीडीज लावण्यात आल्या आहेत. व्होरा यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी २४ तास नर्स, वॉर्डबॉय नियुक्त करण्यात आले आहेत. फिजिओथेरपिस्ट, न्युरोसर्जन, अ‍ॅक्युपंक्चर थेरपिस्ट आणि जनरल फिजीशियन दर आठवड्याला भेट देतात. व्होरा यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे लवकरच ते बरे होतील, अशी आशा त्यांच्या मित्रांना वाटत आहे.
नीरज व्होरा यांच्या पत्नीचे काही काळापूर्वी निधन झाले. त्यांना अपत्य नाही. सध्या त्यांचे मित्र हेच त्यांची अपत्याप्रमाणे काळजी घेत आहेत.
‘कंपनी’, ‘पुकार’, ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘बादशाह’, ‘मन’ यासारख्या  ९० च्या दशकातील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये नीरज व्होरा झळकले होते. ‘अकेले हम अकेले तुम’, ‘रंगीला’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’,‘ जोश’, ‘बादशाह’, ‘हेरा फेरी’, ‘आवारा पागल दिवाना’ यासारखे अनेक चित्रपट त्यांच्या लेखणीतून उतरले. कोमात जाण्यापूर्वी व्होरा यांनी ‘हेराफेरी3’वर काम सुरु केले होते. पण ते कोमात गेल्याने हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला आहे.

Web Title: Neeraj Vohra director of 'Harafari' has been comatose for ten months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.