Neena Gupta : शॉर्ट ब्लॅक वनपीसमध्ये नीना गुप्ता यांचा ग्लॅमरस Video; म्हणाल्या, खूप हिंमत लागते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 13:53 IST2023-01-05T13:48:31+5:302023-01-05T13:53:56+5:30

लोक काय म्हणतील याचा विचार न करणाऱ्या, हवं तसं जगणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नीना गुप्ता. त्या ६३ वर्षांच्या आहेत. पण तरुणींनाही लाजवेल इतक्या त्या फीट आहेत.

neena-gupta-shares-video-wearing-short-black-one-piece-says-it-takes-guts-to-wear-such-dress | Neena Gupta : शॉर्ट ब्लॅक वनपीसमध्ये नीना गुप्ता यांचा ग्लॅमरस Video; म्हणाल्या, खूप हिंमत लागते...

Neena Gupta : शॉर्ट ब्लॅक वनपीसमध्ये नीना गुप्ता यांचा ग्लॅमरस Video; म्हणाल्या, खूप हिंमत लागते...

Neena Gupta :  लोक काय म्हणतील याचा विचार न करणाऱ्या, हवं तसं जगणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नीना गुप्ता. सध्या त्यांच्याकडे सिनेमांची रांग लागली आहे. 'बधाई दो' सिनेमानंतर त्या खूपच चर्चेत आल्या. नीना गुप्ता या ६३ वर्षांच्या आहेत यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. या वयात त्यांनी एक खूपच हिंमतीचे काम केले आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

शॉर्ट ब्लॅक वन पीसमध्ये नीना गुप्ता यांनी केले रील 

नीना गुप्ता या वयातही अतिशय फिट आहेत. तरुणींनाही लाजवेल असे त्यांचे फिटनेस आणि सौंदर्य आहे. सोशल मीडियावरही त्या खूप अॅक्टिव्ह आहेत. नुकताच त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या व्हिडिओ मध्ये त्यांनी अगदी शॉर्ट ब्लॅक वन पीस घातला आहे. सूर्यास्त होत असताना समुद्रकिनारी एका सुंदर ठिकाणी त्यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. 'असा ड्रेस घालणं खूपव हिंमतीचे काम आहे, शेवटी घातलाच,' असे कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिले आहे. यावर चाहते, अगदी तरुणीही फिदा झाल्या आहेत. 'मी तुमच्यामुळे नेहमीच प्रेरित होते, वय तर केवळ एक आकडा आहे कोणत्याही कामासाठी वयाचा अडथळा येत नाही' अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने कमेंट केली की, ' तुम्ही हे कसं करता ?' 

नीना गुप्ता सध्या आणखी एका कारणाने चर्चेत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. विवियन रिचर्ड्स यांच्यासोबतचे रिलेशनशिप, लग्नाआधी प्रेग्नंसी यावर त्यांनी दिलखुलास चर्चा केली. समाजाचे टोमणे ऐकून त्यातून त्या परत कशा उभ्या राहिल्या याविषयी त्यांनी मुलाखतीत चर्चा केली आहे. 

comnnts neena gupta

 

Neena Gupta : 'समाजाचे टोमणे ऐकून जगणं कठीण झालं होतं, घरात कोंंडून...' नीना गुप्ता यांनी शेअर केले वाईट अनुभव

त्यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर त्यांचे नुकतेच 'गुडबाय' आणि 'ऊॅंचाई' हे सिनेमे रिलीज झाले. तसेच त्या मुलगी मसाबाच्या 'मसाबा मसाबा' या सिरीजमध्येही दिसल्या. तर 'पंचायत' या सिरीजमधील भूमिकेसाठी त्यांना ओटीटी फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला. 

Web Title: neena-gupta-shares-video-wearing-short-black-one-piece-says-it-takes-guts-to-wear-such-dress