नयनताराचे सिम्बूसोबतचे इंटिमेट फोटोज झाले होते लीक, MMS स्कँडलनंतर विग्नेशची झाली एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 01:53 PM2022-06-09T13:53:39+5:302022-06-09T13:59:01+5:30

Nayanthara नयनतारा आणि कॉलिवूड अभिनेता सिम्बू (STR) चे काही इंटिमेट फोटो लीक झाले होते ज्यामुळे खूप गदारोळ झाला होता.

Nayanthara simbu kissing mms leak scandal photos before meeting vignesh shivan | नयनताराचे सिम्बूसोबतचे इंटिमेट फोटोज झाले होते लीक, MMS स्कँडलनंतर विग्नेशची झाली एंट्री

नयनताराचे सिम्बूसोबतचे इंटिमेट फोटोज झाले होते लीक, MMS स्कँडलनंतर विग्नेशची झाली एंट्री

googlenewsNext

Nayanthara-Vignesh Shivan Wedding: साऊथ इंडस्ट्रीचं स्टार कपल नयनतारा (Nayanthara) व विग्नेश शिवन (Vignesh Shivan) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. या ग्रँड वेडिंगकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाबलिपुरम येथे नयनतारा व विग्नेश यांचा लग्नसोहळा होणार आहे. लग्नविधी सुरू झाल्या आहेत. महाबलिपुरम येथे एक अख्ख रिसॉर्ट बुक करण्यात आलं आहे. या लग्नासाठी शाहरूख खान, रजनीकांत यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, या लग्नासाठी शाहरूख (Shah Rukh Khan)चेन्नईत पोहोचला आहे. (WikkiNayan)


नयनतारा विघ्नेशसह जवळपास 7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.  Naanum Rowdy Dhan या चित्रपटाच्यादरम्यान ते पहिल्यांदा भेटले होते. 2015 मध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे जवळ आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. याआधी नयनताराचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत राहिले आहे.


विघ्नेशसोबतच्या नात्यापूर्वी नयनताराचे नाव 2014 मध्ये एमएमएस लीकच्या कॉन्ट्रोवर्सीत आले होते. नयनतारा आणि कॉलिवूड अभिनेता सिम्बू (STR) चे काही इंटिमेट फोटो लीक झाले होते ज्यामुळे खूप गदारोळ झाला होता. वल्लवन चित्रपटादरम्यान दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते, मात्र काही काळानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही आल्या. यानंतर दोघांचे इंटिमेट किसिंग फोटो लीक झाले होते. त्यावेळी हे फोटो सिम्बूने लीक केल्याचे बोलले जात होते.


मात्र, या कॉन्ट्रोवर्सीनंतर काही वर्षांनी सिम्बूने आपण हे केले नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, सिम्बूने सांगितले होते की त्यांनी दुबईच्या व्हॅकेशनदरम्यान नवीन कॅमेरा घेतला होता. त्यांनी कॅमेऱ्याची क्वॉलिटी चेक करण्यासाठी काही फोटो क्लिक केले होते. यातील काही फोटो लीक झाले होते. 


 

Web Title: Nayanthara simbu kissing mms leak scandal photos before meeting vignesh shivan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.