Love Story: विग्नेशसोबत लग्न करणाऱ्या नयनतारामुळे मोडला प्रभूदेवाचा संसार; कोरिओग्राफरने तोडलं १६ वर्षांचं नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:32 PM2022-06-09T12:32:08+5:302022-06-09T12:46:36+5:30

Nayanthara and prabhu deva: काही वर्षांपूर्वी नयनतारा आणि प्रभूदेवा यांचं अफेअर मोठं चर्चिलं गेलं होतं. प्रभूदेवासाठी नयनतारा धर्म बदलण्यास तयार होती. इतकंच नाही तर प्रभूदेवानेही आपल्या पत्नी, मुलांना एकटं सोडलं होतं.

nayanthara and prabhu devas love life actress change the religion know why the love life is incomplete | Love Story: विग्नेशसोबत लग्न करणाऱ्या नयनतारामुळे मोडला प्रभूदेवाचा संसार; कोरिओग्राफरने तोडलं १६ वर्षांचं नातं

Love Story: विग्नेशसोबत लग्न करणाऱ्या नयनतारामुळे मोडला प्रभूदेवाचा संसार; कोरिओग्राफरने तोडलं १६ वर्षांचं नातं

googlenewsNext

गेल्या काही काळात दाक्षिणात्य कलाविश्वातील चित्रपट आणि कलाकार मंडळी सातत्याने चर्चेत येत आहेत. समंथा रुथ प्रभू, काजल अग्रवाल, रश्मिका मंदाना आणि नयनतारा या अभिनेत्री या ना त्या कारणामुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळतं. यात सध्या अभिनेत्री नयनतारा हिची चर्चा रंगली आहे. नयनतारा लवकरच दिग्दर्शक विग्नेश विग्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. परंतु, या लग्नामध्येच तिची लव्ह लाइफ चर्चेत आली आहे. एकेकाळी नयनतारा प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभूदेवा याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.

नयनतारा दिग्दर्शक विग्नेशसोबत लग्न करत आहे. त्यामुळे या लग्नाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. मात्र, काही वर्षांपूर्वी नयनतारा आणि प्रभूदेवा यांचं अफेअर मोठं चर्चिलं गेलं होतं. प्रभूदेवासाठी नयनतारा धर्म बदलण्यास तयार होती. इतकंच नाही तर प्रभूदेवानेही आपल्या पत्नी, मुलांना एकटं सोडलं होतं. मात्र, काही काळ लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यावर ही जोडी विभक्त झाली.

संपत्तीच्या बाबतीत बायको ठरणार वरचढ; जाणून घ्या, विग्नेश-नयनताराचं Net worth 
 

 प्रभूदेवाचा प्रेमात वेडी झाली होती नयनतारा

नयनतारा आणि प्रभूदेवा यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात ‘Villu’ या चित्रपटापासून झाली होती. हा चित्रपट प्रभूदेवा डिरेक्ट करत होते. या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या या जोडीने काही काळ एकमेकांना डेट केलं. इतकंच नाही तर प्रभूदेवाने त्याच्या पत्नीलाही सोडलं होतं. प्रभूदेवा एकीकडे नयनतारासोबत असलेलं नातं लपवत होता. तर नयनताराने त्याच्या नावाचं टॅटू काढत हे नातं जाहीरपणे सांगितलं होतं.

प्रभूदेवाच्या पत्नीने घेतली कोर्टात धाव

प्रभूदेवा आणि नयनतारा यांच्या नात्याची भनक लागताच त्याच्या पत्नीने लता यांनी २०१० मध्ये फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती. यात नयनतारा-प्रभूदेवा लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात असल्याचं तिने सांगितलं. इतकंच नाही तर प्रभूदेवाने नयनतारासोबत लग्न केलं तर मी उपोषण करेन अशी धमकीदेखील तिने दिली. त्यामुळे प्रभूदेवाने पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर तो नयनतारापासूनही दूर गेला.

नयनतारा अन् प्रभूदेवा असे झाले विभक्त

पत्नीच्या तक्रारीनंतर प्रभूदेवाने नयनतारासाठी एक मोठा निर्णय घेतला. त्याने २०११ मध्ये पत्नीसोबत असलेलं १६ वर्षांचं नातं संपवलं. त्याने लताला घटस्फोट दिला. यावेळी पोटगीच्या स्वरुपात त्याने लताला 10 लाख रुपये, 20 ते 25 कोटींची प्रॉपर्टी आणि दोन कार दिलं. विशेष म्हणजे ज्या नयनतारासाठी त्याने पत्नीला सोडलं. त्या नयनतारानेही त्याची साथ सोडली. नयनताराने 2012 मध्ये प्रभूदेवासोबतचं नातं संपल्याचं जाहीर केलं. 

Web Title: nayanthara and prabhu devas love life actress change the religion know why the love life is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.