Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनपासून घटस्फोट, आलियाच्या आयुष्यात मिस्ट्रीमॅनची एन्ट्री; फोटो शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 18:40 IST2023-06-05T18:39:35+5:302023-06-05T18:40:04+5:30
नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच पत्नी आलियापासून घटस्फोट घेणार आहे.

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनपासून घटस्फोट, आलियाच्या आयुष्यात मिस्ट्रीमॅनची एन्ट्री; फोटो शेअर करत म्हणाली...
Aaliya Siddiqui Mystry Man: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात लवकरच घटस्फोट होणार आहे. दोघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. कधी आलिया नवाजुद्दीनवर आरोप करायची, तर कधी नवाजुद्दीन आरोपांच्या उत्तरांसह पत्नीवर प्रश्न उपस्थित करायचा. अखेर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, नवाजुद्दीनपासून वेगळी झाल्यानंतर आता आलियाच्या आयुष्यात दुसरा व्यक्ती आला आहे. आलियाने इंस्टाग्रामवर एका अनोळखी व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच, इशाऱ्यांमधून प्रेमाची कबुलीही दिली आहे. आलियाने इंस्टाग्रामवर लिहिले की, “ज्या नात्याला मी आपलं मानलं होतं, त्यातून बाहेर पडायला मला 19 वर्षे लागली. माझ्या आयुष्यात माझी मुलं हीच माझी प्राथमिकता आहे आणि ते नेहमी राहतील.''
या पोस्टमध्ये आलियाने तिच्या नवीन नात्याबद्दल सांगितले आहे. “अशी काही नाती असतात जी मैत्रीच्या पलीकडे जातात आणि त्याहून मोठी असतात. आमचं नातं मैत्रिच्या पलीकडे गेलं, याचा मला खूप आनंद आहे. त्यामुळेच मी तुम्हा सर्वांसोबत माझा आनंद व्यक्त करत आहे. मला आनंदी राहण्याचा अधिकार नाही का?'' अशी पोस्ट आलियाने केली आहे.
मिस्ट्रीमॅन कोण
आलियाने एका मीडिया हाउसशी बोलताना तिच्यासोबतच्या मिस्ट्री मॅनचे कौतुक केले. “त्याच्या समजुतीने मी खूप प्रभावित झाले. पैसा तुम्हाला आनंद देऊ शकत नाही, परंतु व्यक्ती देते. तो माझा खूप आदर करतो,'' असे तिने म्हटले. आलियाने सांगितल्यानुसार, तिचा मिस्ट्रीमॅन इटलीचा आहे आणि ती त्याला दुबईमध्ये भेटली होती. दोघेही खूप दिवसांपासून मित्र आहेत. आलियाने मिस्ट्री मॅनचे नाव जाहीर केले नाही.