Nawazuddin Siddiqui : चित्रपटांचे बजेट हे अभिनेत्यांच्या मानधनामुळेच वाढते; नवाजुद्दीन सिद्दीकी स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 17:00 IST2022-12-11T17:00:46+5:302022-12-11T17:00:56+5:30
नवाजुद्दीन सिद्दीकीने मेहनतीने इंडस्ट्रीत यश मिळवलं आहे. तो जितका शांत स्वभावाचा वाटतो तितकाच बेधडकही आहे.

Nawazuddin Siddiqui : चित्रपटांचे बजेट हे अभिनेत्यांच्या मानधनामुळेच वाढते; नवाजुद्दीन सिद्दीकी स्पष्टच बोलला
बॉलिवुडमध्ये प्रतिभावान म्हणावे असे जे अभिनेते आहेत त्यातलाच एक नवाजुद्दीन सिद्दीकी. स्क्रीप्टची निवड, उत्तम अभिनय, प्रेक्षकांना कसं खिळवून ठेवता येईल हे त्याला बरोबर कळतं. नवाजुद्दीन सिद्दीकीने मेहनतीने इंडस्ट्रीत यश मिळवलं आहे. तो जितका शांत स्वभावाचा वाटतो तितकाच बेधडकही आहे. हे नुकतेच त्याने केलेल्या एका विधानातून स्पष्ट होतं.
बॉलिवुड अभिनेत्यांच्या मानधनावरुन नवाजुद्दीनने मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, काही अभिनेते एका चित्रपटासाठी कोटी च्या कोटी मानधन घेतात मग फिल्मचं बजेट वाढणार नाही. कमी बजेटचे चित्रपट फ्लॉप होत नाहीत.असे म्हणत नावजने बॉलिवुडच्या अनेक अभिनेत्यांवर निशाणा साधला आहे.चित्रपट चालणे न चालणे हे त्याच्या बजेटवरही अवलंबून असते.
नवाज लवकरच हड्डी या सिनेमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याने ट्रांसजेंडरची भुमिका साकारली आहे. सिनेमातील त्याचा लुक बघुन चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे.