"मला कधीच अभिनय करावा वाटला नाही...", बिग बींच्या नातीने सांगितलं कारण, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:18 IST2025-10-27T17:17:19+5:302025-10-27T17:18:51+5:30
फिल्म इंडस्ट्रीबद्दल नव्या म्हणाली, "या क्षेत्रात..."

"मला कधीच अभिनय करावा वाटला नाही...", बिग बींच्या नातीने सांगितलं कारण, म्हणाली...
अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आणि श्वेता बच्चन नंदाची लेक नव्या नवेली नंदा आपल्या निरागस सौंदर्याने अभिनेत्रींनाही टक्क देते. नव्या नवेली सध्या IIM अहमदाबादमधून एमबीएचं शिक्षण घेत आहे. तर दुसरीकडे ती 'पॅरिस फॅशन वीक'मध्ये आपला जलवाही दाखवते. आई श्वेता आणि आजी जया यांच्यासोबत तिचे पॉडकास्टही व्हायरल झाले होते. तसंच नव्या बिझनेसवुमन आहे. 'प्रोजेक्ट नवेली' हे तिचं नॉन प्रॉफिट ऑर्गनायजेशन आहे. याधून ती अनेकांना मदत करते. नव्याने कधीच आजी-आजोबा, मामा-मामी यांच्याप्रमाणे अभिनय क्षेत्रात यायचा विचार केला नाही. यामागचं कारण तिने नुकतंच सांगितलं आहे.
'मोजो स्टोरी'ला दिलेल्या मुलाखतीत नव्या नवेली नंदा म्हणाली, " नाही मी कधीच अभिनय क्षेत्रात यायचा विचार केला नाही. मला नेहमीच हा प्रश्न विचारला जातो. पण का माहित नाही...आईवडिलांनी माझ्यावर हेच संस्कार केले की अशी कोणतीही गोष्ट करु नको ज्यासाठी तू पॅशनेट नाहीस किंवा १०० टक्के तुला खात्री नाही. तुला जे खरंच करायचं आहे तेच तू कर. आणि मला अभिनय कधीच करायचा नव्हता. मला नेहमीच वडील जे काम करतात ते पाहून नवल वाटायचं. ते कामावरुन आले की मी त्यांना त्याविषयी विचारायचे. माझ्यासाठी ते खूप उत्साहपूर्ण होतं."
ती पुढे म्हणाली, "मला सिनेमे पाहायला आवडतात. मला गाणी ऐकायला आवडतात. माझ्या कुटुंब या क्षेत्रात आहे याची मला कल्पना आहे. त्यांचं आणि इतरांचंही काम मी सतत पाहत राहते. माझं सीक्रेच टॅलेंट सांगायचं तर मला कोणत्याही गाण्याची हुकस्टेप लक्षात असते. मला हे माध्यम आवडतं कारण यात खूप क्षमता आहे. पण मला कधीच या माध्यमाचा भाग होण्याची इच्छा झाली नाही. माझं पॅशन, उत्साह आणि रस वेगळ्या गोष्टींमध्ये आहे."
नव्या नवेलीचे इंडस्ट्रीत अनेक मित्र मंडळी आहेत. सुहाना खान, अनन्या पांडे, शनाया कपूर या स्टारकिड्स तिच्या खास मैत्रिणी आहेत. नव्या अनेकदा त्यांच्यासोबत दिसते. तसंच नव्याचा भाऊ अगस्त्यने 'द आर्चीज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्याचा 'इक्कीस' सिनेमा रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे सुहाना खान आणि अगस्त्य एकमेकांना डेट करत आहेत.