सिनेप्रेमींसाठी खास ऑफर, फक्त 99 रुपयांत पहा कोणताही चित्रपट; कधी आणि कुठे? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 05:54 PM2023-10-12T17:54:20+5:302023-10-12T17:54:52+5:30

13 ऑक्टोबरला फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे.

National Cinema Day: Movie tickets at Rs 99 on BookMyShow, PayTM, more | सिनेप्रेमींसाठी खास ऑफर, फक्त 99 रुपयांत पहा कोणताही चित्रपट; कधी आणि कुठे? जाणून घ्या

cinema

देशभरातील चित्रपटप्रेमींना केवळ 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. देशभरात 13 ऑक्टोबर 2023 रोजी 'राष्ट्रीय चित्रपट दिन' साजरा करण्यात येणार आहे. या निमित्तानं  मल्टिप्लेक्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं ही भन्नाट ऑफर सिनेमाप्रेमींना देण्यात आली आहे. 

13 ऑक्टोबरला फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. खिशावर कोणताही भार न टाकता आवडीचे चित्रपटांचा आनंद घेता येईल. तुम्ही भारतात कुठेही, कोणत्याही चित्रपटगृहात बुक माय शो आणि पेटीएमसह कोणत्याही अधिकृत राष्ट्रीय सिनेमा चेन वेबसाइटवरून तिकीट बुक करु शकतात. यात फक्त रेक्लिनर आणि प्रीमियम सीट्स समाविष्ट नाहीत.

विशेष म्हणजे खाद्यपदार्थांवरही सवलत असणार आहे. पॉपकॉर्न, कोल्ड ड्रिंक्स, कॉफी आणि इतर खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेऊ शकतात. ज्यांच्या किंमती फक्त 99 रुपयांपासून सुरू होतील. पिव्हिआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, सिटीप्राइड, एशियन, मुक्ता ए2, मूव्ही टाइम, वेव, एम3के आणि डीलाइट यासह अनेक मल्टिप्लेक्स आणि थिएटर्समध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता. 

सध्या चित्रपटगृहात अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. यात अक्षय कुमारचा नुकताच रिलीज झालेला 'मिशन राणीगंज' आहे. याशिवाय तुम्ही  फुकरे 3, द व्हॅक्सिन वॉर, जवान, चंद्रमुखी 3, थँक यू फॉर कमिंग आणि द एक्सॉर्सिस्ट यासह अनेक चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. 

Web Title: National Cinema Day: Movie tickets at Rs 99 on BookMyShow, PayTM, more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.