घटस्फोट जाहीर करण्याआधी नताशाने पांड्या कुटुंबातील 'या' व्यक्तीसाठी केली होती पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 10:34 IST2024-07-19T10:33:59+5:302024-07-19T10:34:56+5:30

हार्दिकसोबत घटस्फोटानंतरही त्याच्या कुटुंबासोबत नताशा आहे खास बाँड

Natasa Stankovic wishes Krunal Pandya s son Kavir Happy Birthday before announcing divorce | घटस्फोट जाहीर करण्याआधी नताशाने पांड्या कुटुंबातील 'या' व्यक्तीसाठी केली होती पोस्ट

घटस्फोट जाहीर करण्याआधी नताशाने पांड्या कुटुंबातील 'या' व्यक्तीसाठी केली होती पोस्ट

क्रिकेट आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत कालपासून एकच चर्चा आहे ते म्हणजे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशाचा (Natasa Stankovic) घटस्फोट. गेल्या काही दिवसांपासून ज्याची चाहूल होती तेच घडले. काल हार्दिक आणि नताशाने सोशल मीडिया पोस्ट करत घटस्फोट जाहीर केला. ही पोस्ट करण्याआधीच नताशा लेकाला घेऊन तिचं होमटाऊन सर्बियाला पोहोचली होती. विशेष म्हणजे घटस्फोट जाहीर करण्याआधी नताशाने 'पांड्या' कुटुंबातील या व्यक्तीसाठी पोस्ट लिहिली होती.

हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतरही नताशाचा त्याच्या कुटुंबासोबत चांगला बाँड आहे. नताशा भारत सोडून सर्बियाला गेली असली तरी तिने लाडक्या कवीरसाठी पोस्ट केली. कवीर म्हणजे कृणाल पांड्याचा मुलगा. कवीरचा काल वाढदिवस होता. नताशाने सर्बियामधूनच सोशल मीडियावर कवीरसोबतचा फोटो शेअर करत लिहिले, "हॅपी बर्थडे माय कवुली बावुली. माझ्या छोट्या बाळा, देव नेहमी तुझ्या पाठीशी राहो. खूप प्रेम, टिया नट्स."

यासोबत नताशाने हा फोटो लेकाने म्हणजे अगस्त्यने काढल्याचंही नमूद केलं. लग्नानंतर ४ वर्षांनी हार्दिक आणि नताशा वेगळे झाले आहेत. बरेच प्रयत्न करुनही ते नातं टिकवू शकले नाहीत. आयपीएलपासूनच दोघांमध्ये बिनसल्याचं समोर आलं होतं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही नताशान हार्दिकसाठी एकही पोस्ट केली नव्हती. यानंतर तिने आयुष्यासंदर्भात अनेक क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्या होत्या. काल दोघांनी घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं. 

Web Title: Natasa Stankovic wishes Krunal Pandya s son Kavir Happy Birthday before announcing divorce