राजेश खन्नांच्या नातीला पाहिलंत का? दिसतेय खूपच सुंदर, आजी डिंपलसोबत स्क्रीनिंगला पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:16 IST2025-01-24T17:15:06+5:302025-01-24T17:16:17+5:30

ट्विंकल खन्नाची सख्खी बहीण रिंकी खन्नाची ती मुलगी आहे. सौंदर्याबाबतीत सर्वच स्टारकीड्सला देते टक्कर

naomika saran grand daughter of rajesh khanna attended screening of sky force with dimple kapadia | राजेश खन्नांच्या नातीला पाहिलंत का? दिसतेय खूपच सुंदर, आजी डिंपलसोबत स्क्रीनिंगला पोहोचली

राजेश खन्नांच्या नातीला पाहिलंत का? दिसतेय खूपच सुंदर, आजी डिंपलसोबत स्क्रीनिंगला पोहोचली

अभिनेता अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' सिनेमाचं स्क्रीनिंग काल मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला बॉलिवूडमधील अनेक कलाकार हजर होते. शिवाय काही स्टारकीड्सनेही हजेरी लावली. सिनेमात अक्षयसोबत वीर पहाडियाही मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान या स्क्रीनिंगला एका सुंदर मुलीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.  ती आहे राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाची नात नाओमिका सरन (Naomika Saran).

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांना दोन मुली आहे. एक ट्विंकल खन्ना सगळ्यांनच माहित आहे जी अक्षयची पत्नी आहे. तर दुसरी रिंकी खन्ना.  रिंकी सुरुवातीला काही बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसली होती. मात्र सिनेमे चालत नसल्याने ती अचानक गायब झाली. २००३ साली तिने समीर सरनसोबत लग्न केलं. तर २००४ साली रिंकी खन्नाने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. ती मुलगी नाओमिका सरन जी आज २० वर्षांची आहे. नाओमिकाच्या सौंदर्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. ब्लॅक टॉप, ब्लू जीन्स आणि मोकळे केस अशा लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. आजी डिंपल कपाडियाचा हात धरुन ती स्क्रीनिंगबाहेर पडली. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


नाओमिकाची आई रिंकीने खन्नाने 'जिस देश मे गंगा रहता है', 'ये है जलवा', 'चमेली', 'मुझे कुछ कहना है' या काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. रिंकी खन्ना नवऱ्यासोबत लंडनमध्ये राहते. नाओमिकाला पाहून आता तिच्या बॉलिवूड एन्ट्रीची चर्चा होत आहे. अद्याप तिच्या कुटुंबाकडून याविषयी काही माहिती आलेली नाही.

Web Title: naomika saran grand daughter of rajesh khanna attended screening of sky force with dimple kapadia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.