लहानग्याला सेल्फीचा मोह अन् नानांचा संताप; रागात चाहत्याच्या डोक्यात मारला फटका, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 13:08 IST2023-11-15T13:07:25+5:302023-11-15T13:08:03+5:30

नाना पाटेकरांचं वेगळंच रूप व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

nana patekar slaps fan who trying to take selfie during movie shooting video viral | लहानग्याला सेल्फीचा मोह अन् नानांचा संताप; रागात चाहत्याच्या डोक्यात मारला फटका, व्हिडिओ व्हायरल

लहानग्याला सेल्फीचा मोह अन् नानांचा संताप; रागात चाहत्याच्या डोक्यात मारला फटका, व्हिडिओ व्हायरल

नाना पाटेकर हे कलाविश्वातील मोठं नाव आहे. मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही नानांनी जम बसवला. गेली कित्येक दशकं ते प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजनही करत आहेत. सध्या ते त्यांच्या आगामी 'जर्नी' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. या शूटिंगदरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नाना पाटेकरांचं वेगळंच रूप पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

एका ट्वीटर अकाऊंटवरुन नाना पाटेकरांचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये शूटिंगदरम्यान एका छोटा चाहता नाना पाटेकरांबरोबर सेल्फी काढायला येत असल्याचं दिसत आहे. त्या चाहत्याला नाना पाटेकरांबरोबर सेल्फी काढण्याचा मोह अनावर होतो. पण, सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याच्या डोक्यात नाना पाटेकर रागाच्या भरात जोरात मारत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. रागात त्याला काहीतरी बोलत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर बाजूलाच असलेली एक व्यक्ती त्या चाहत्याला बाजूला घेऊन जाते. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सध्या नाना पाटेकर 'जर्नी' चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाराणसीत आहेत. अनिल शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून 'गदर २' फेम उत्कर्ष शर्माही या सिनेमात झळकणार आहे.नाना पाटेकर अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटात दिसले होते. पण, विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फार चांगलं यश मिळालं नाही. 

Web Title: nana patekar slaps fan who trying to take selfie during movie shooting video viral