"जॅकलिन तू कशी आहेस?" नाना पाटेकरांनी विचारला मराठीत प्रश्न, तिचं उत्तर ऐकून सगळेच हसले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:59 IST2025-05-28T15:53:17+5:302025-05-28T15:59:14+5:30

नाना पाटेकर आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा व्हिडीओ चर्चेत आलाय.

Nana Patekar Asked A Question In Marathi To Jacqueline Fernandez At Housefull 5 Trailer Launch Video Viral | "जॅकलिन तू कशी आहेस?" नाना पाटेकरांनी विचारला मराठीत प्रश्न, तिचं उत्तर ऐकून सगळेच हसले!

"जॅकलिन तू कशी आहेस?" नाना पाटेकरांनी विचारला मराठीत प्रश्न, तिचं उत्तर ऐकून सगळेच हसले!

सध्या 'हाऊसफुल्ल ५' या सिनेमाची चर्चा सगळीकडे आहे. काल या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. या ट्रेलर लाँच सोहळ्याला मराठमोळे नाना पाटेकर, अक्षय कुमार, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, चित्रांगदा सिंग, जॅकलिन फर्नांडिस, डिनो मोरिया, अभिषेक बच्चन असे सिनेमातील सर्व कलाकार हजर होते. ट्रेलर लाँच कार्यक्रमातील अनेक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यातलाच एक नाना पाटेकर आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा व्हिडीओ चर्चेत आलाय.

ट्रेलर लाँच सोहळ्यात नाना पाटेकर यांचा देसी आणि दिलखुलास अंदाज पाहायला मिळाला. पत्रकारांशी संवाद साधताना नाना पाटेकर यांंनी सांगितलं की, ते सेटवर सर्वांशी मराठीत बोलायचे. सिनेमातील स्टारकास्टशी मराठीमध्ये बोलणं हेच एकाप्रकारे प्रँक करण्यासारखं होतं, असं ते म्हणाले. हे सांगताना त्यांनी लगेचच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मराठीत एक प्रश्न विचारला, "तू कशी आहेस?" . जॅकलिनला मराठी फारशी समजत नसल्यामुळे ती गोंधळलेली दिसली. पण, इतरांनी तिला मदत केली आणि तिने "मी बरी आहे. मी छान आहे" असं उत्तर दिलं. तिचं हे उत्तर ऐकून उपस्थित सर्वांचे चेहरे खुलले.

यानंतर नानांनी सेटवरील आठवणी शेअर करत सांगितलं, "मी सेटवर यांच्यावर प्रँक करायचो. मराठीत बोलायचो. काही अपवाद वगळता यापैकी कोणालाच मराठी येत नाही. खरं तर काही जणांना हिंदीही नीट बोलता येत नाही. त्यामुळे आमच्या सेटवर कायमच हास्याचं आणि मजेचं वातावरण असायचं. चित्रपटात एकूण १८ कलाकार एकत्र होते. इतक्या मोठ्या स्टारकास्टमध्येही कुणालाही असुरक्षित वाटलं नाही, हीच आमच्या टीमची खासियत आहे". नाना आणि जॅकलिनचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल यात शंका नाही.


'हाऊसफुल्ल ५' कधी प्रदर्शित होणार?

 बिग बजेट असलेला हा  धमाल विनोदी चित्रपट ६ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. साजिद नाडियादवाला यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या मल्टिस्टारर सिनेमात नाना पाटेकरांना बघण्याची सर्वांना उत्सुकता आहे. कॉमेडी फ्रँचायजी असलेला 'हाउसफुल्ल' सिनेमाचा हा पाचवा भाग आहे. यानिमित्ताने एखाद्या सिनेमाचे पाच भाग येण्याची ही पहिलीच वेळ असेल. 

Web Title: Nana Patekar Asked A Question In Marathi To Jacqueline Fernandez At Housefull 5 Trailer Launch Video Viral