'नागिन', 'जानी दुश्मन' फेम दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचं निधन, ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 01:39 PM2023-11-24T13:39:50+5:302023-11-24T13:42:52+5:30

अभिनेता अरमान कोहली यांचे ते वडील होते.

Naagin Jaani Dushman fame director Rajkumar Kohli passed away at the age of 93 son of actor Armaan kohli | 'नागिन', 'जानी दुश्मन' फेम दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचं निधन, ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'नागिन', 'जानी दुश्मन' फेम दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचं निधन, ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'नागिन' आणि 'जानी दुश्मन' सारखे फिक्शन हिट देणारे दिग्दर्शक निर्माता राजकुमार कोहली (Rajkumar Kohli) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता अरमान कोहली (Armaan Kohli) यांचे ते वडील होते. आज शुक्रवारी सकाळीच त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने  त्यांचं निधन झालं.

माध्यम रिपोर्टनुसार, राजकुमार कोहली हे सकाळी अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले. बराच वेळ झाला ते बाहेर आले नाहीत. तेव्हा बाथरुमचा दरवाजा तोडावा लागला. ते जमिनीवर पडले होते. त्यांना लगेच रुग्णालयात  नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

राजकुमार कोहली यांचा जन्म 1930 साली झाला. १९६३ साली त्यांनी 'सफर' या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. मात्र 1976 साली 'नागिन' या मल्टिस्टारर सिनेमाने त्यांना लोकप्रियता मिळाली. यानंतर 1979 साली त्यांनी 'जानी दुश्मन' हा सिनेमा बनवला जो भारतातील पहिला सुपरहिट हॉरर चित्रपट ठरला. 

Web Title: Naagin Jaani Dushman fame director Rajkumar Kohli passed away at the age of 93 son of actor Armaan kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.