आता मला गर्भाशय नाही...! या सेलिब्रिटीने पोस्ट लिहून केला खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 15:47 IST2019-09-01T15:30:42+5:302019-09-01T15:47:01+5:30

गत महिन्यात मी दुहेरी शस्त्रक्रिया केली. आता माझ्याकडे गर्भाशय नाही....

musician anoushka shankar underwent hystrectomy surgery | आता मला गर्भाशय नाही...! या सेलिब्रिटीने पोस्ट लिहून केला खुलासा!!

आता मला गर्भाशय नाही...! या सेलिब्रिटीने पोस्ट लिहून केला खुलासा!!

ठळक मुद्देअनुष्का शंकरला सहा वेळा ग्रॅमी पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे.

सुप्रसिद्ध सतारवादक अनुष्का शंकर हिने एक मोठा खुलासा केला आहे. होय, अनुष्काने शस्त्रक्रियेद्वारे आपले गर्भाशय काढून टाकले.  डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने ही शस्त्रक्रिया केली.
अनुष्काने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. ती लिहिते, ‘गत महिन्यात मी दुहेरी शस्त्रक्रिया केली. आता माझ्याकडे गर्भाशय नाही. माझ्या पोटात आणि गर्भाशयात जवळपास 13 ट्युमर होते. माझे गर्भाशय सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेसारखे झाले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय काढले. काही महिन्यांपूर्वी गर्भाशय काढावे लागणार, हे मला कळले तेव्हा मी प्रचंड तणावाखाली होते.

भविष्यात आपण अपत्य जन्माला घालू शकणार नाही, ही भीती होती. एवढेच नाही तर आपले काही बरेवाईट झाले तर आपली दोन्ही मुलं आईवाचून पोरकी होतील, अशी भीतीही वाटत होती. पण मी माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रांशी बोलले. असंख्य महिला या शस्त्रक्रियेतून जातात, असे मला त्यांनी सांगितले. आधी मला याबद्दल काहीही ठाऊक नव्हते. मला आश्चर्य वाटले. ही शस्त्रक्रिया इतकी सामान्य आहे तर याबद्दल कुणी काही बोलत का’
नाही? मी एका महिलेला हाच प्रश्न केला. यावर आम्ही महिलांशी संबंधित लहान-मोठ्या गोष्टींचा प्रचार करत नाही, काय करायचेय असा प्रचार करून, असे ती मला म्हणाली. मी पहिल्यांदा गर्भवती झाले, तेव्हा मला प्रचंड त्रासातून जावे लागले. पण अलीकडे मला प्रचंड वेदनेतून जावे लागत होते. अखेर डॉक्टरांनी मला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.’ 


अनुष्का ही दिवंगत सतार वादक पंडित रविशंकर यांची मुलगी आहे. अनुष्का शंकर देखील लोकप्रिय सतारवादक आहे.  

अनुष्काचा जन्म लंडनमध्ये झाला, मात्र तिचे बालपण अमेरिका, यूके आणि भारतात गेले. अनुष्का शंकरला सहा वेळा ग्रॅमी पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे. लहानपणी अनेक वर्षे लैंगिक शोषण झाल्याचा खळबळजनक खुलासा अनुष्काने केला होता.

Web Title: musician anoushka shankar underwent hystrectomy surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.