प्रतीक्षा संपली! लिहून ठेवा तारीख, 'या' दिवशी OTTवर रिलीज होणार तगडी स्टारकास्ट असलेला 'मर्डर मुबारक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 11:14 IST2024-03-05T11:13:04+5:302024-03-05T11:14:09+5:30

'मर्डर मुबारक' हा OTT वर येणाऱ्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.

Murder Mubarak Trailer Release Time: Here's When Sara, Pankaj & Karisma Starrer's Trailer Will Be Out Today | प्रतीक्षा संपली! लिहून ठेवा तारीख, 'या' दिवशी OTTवर रिलीज होणार तगडी स्टारकास्ट असलेला 'मर्डर मुबारक'

'या' दिवशी OTTवर रिलीज होणार तगडी स्टारकास्ट असलेला 'मर्डर मुबारक'

'मर्डर मुबारक' हा OTT वर येणाऱ्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. दिग्गज कलाकारांची भूमिका असलेला हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपुर्वी चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.  ज्यामध्ये थ्रिलर, सस्पेन्स आणि मर्डरची झलक पाहायला मिळाली.  अखेर आता सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.

होमी अदजानिया दिग्दर्शित "मर्डर मुबारक" हा सिनेमानेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर उद्या म्हणजेच ५ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात कॉमेडीचाही पूर्ण डोस असणार आहे. सिनेमात सारा अली खान, डिंपल कपाडिया, संजय कपूर, टिस्का चोप्रा, पंकज त्रिपाठी, करिश्मा कपूर, विजय वर्मा आणि सुहेल नायर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हा चित्रपट 15 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री करिश्मा कपूर 11 वर्षांनंतर ओटीटीद्वारे इंडस्ट्रीत पुनरागमन करत आहे. हा सिनेमा अनुजा चौहान यांच्या "क्लब यू टू डेथ" या पुस्तकावर आधिरत असल्याची माहिती आहे. तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या अनोख्या आणि हटके मर्डर मिस्ट्री चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
 

Web Title: Murder Mubarak Trailer Release Time: Here's When Sara, Pankaj & Karisma Starrer's Trailer Will Be Out Today