शाहरुख खानसमोरच सुहानासोबत रोमान्स करणार 'हा' अभिनेता, 'किंग' मध्ये लागली वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 15:58 IST2024-08-08T15:57:23+5:302024-08-08T15:58:33+5:30

शाहरुख खानचा लेक सुहानासोबत 'किंग' सिनेमा येणार आहे. यात कोणत्या अभिनेत्याची झाली एन्ट्री?

Munjya fame actor Abhay Verma to star in Shahrukh Khan Suhana s King action movie | शाहरुख खानसमोरच सुहानासोबत रोमान्स करणार 'हा' अभिनेता, 'किंग' मध्ये लागली वर्णी

शाहरुख खानसमोरच सुहानासोबत रोमान्स करणार 'हा' अभिनेता, 'किंग' मध्ये लागली वर्णी

शाहरुख खानची (Shahrukh Khan)लाडकी लेक सुहाना खानने (Suhana Khan) गेल्या वर्षी 'द आर्चीज' सिनेमातून पदार्पण केलं. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला होता. पहिल्याच सिनेमानंतर सुहानाची एका अॅक्शन थ्रिलर सिनेमात वर्णी लागली. यामध्ये खुद्द शाहरुख खानही असणार आहे. 'किंग' असं सिनेमाचं आहे. सध्या शाहरुख-सुहाना याच सिनेमाची तयारी करत आहेत. दरम्यान आता 'किंग' मध्ये एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे जो शाहरुखसमोरच सुहानासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान, सुहाना खान स्टार 'किंग' मध्ये 'मुंज्या' फेम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. अभिनेता अभय वर्माची (Abhay Verma) या सिनेमात वर्णी लागली आहे. 'मुंज्या'मधील भूमिकेमूळे सर्वच अभयचे चाहते झाले. याचाच फायदा त्याला झाला कारण खुद्द शाहरुखच्या सिनेमात आता त्याला काम करण्याची संधी मिळाली आहे. 


'किंग'मध्ये शाहरुख, सुहाना खान शिवाय अभिषेक बच्चनही दिसणार आहे. ज्युनिअर बच्चन यामध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, 'मुंज्या' ला मिळालेलं यश पाहता त्याला या सिनेमाची ऑफर मिळाली. या सिनेमासाठी तो खूप उत्साहित आहे. अद्याप सिनेमातील त्याच्या भूमिकेविषयी माहिती मिळालेली नाही. 

'किंग' सिनेमाचं दिग्दर्शन सुजॉय घोष करणार आहेत. अभय वर्माने याआधी मनोज वाजपेयींच्या गाजलेल्या 'द फॅमिली मॅन' मध्येही छोटी भूमिका साकारली होती. त्याच्या 'मुंज्या' सिनेमाने त्याला रातोरात स्टार केलं आहे.

Web Title: Munjya fame actor Abhay Verma to star in Shahrukh Khan Suhana s King action movie