"मला त्यांनी धर्मेंद्रजींना भेटूही दिलं नाही", मुमताज यांचं वक्तव्य, म्हणाल्या- "मी हॉस्पिटलमध्ये अर्धा तास..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:15 IST2025-11-27T14:15:10+5:302025-11-27T14:15:59+5:30
बॉलिवूड अभिनेत्री मुमताजही त्यांना भेटण्यासाठी रुग्णलयात गेल्या होत्या. मात्र त्यांना धर्मेंद्रजींना भेटू दिलं नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.

"मला त्यांनी धर्मेंद्रजींना भेटूही दिलं नाही", मुमताज यांचं वक्तव्य, म्हणाल्या- "मी हॉस्पिटलमध्ये अर्धा तास..."
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवारी(२४ नोव्हेंबर) निधन झालं. मुंबईतील जुहू येथील राहत्या घरी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होतं. ८ डिसेंबरला त्यांचा ९०वा वाढदिवस साजरा होणार होता. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वीच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अनेक सेलिब्रिटीही त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. बॉलिवूड अभिनेत्री मुमताजही त्यांना भेटण्यासाठी रुग्णलयात गेल्या होत्या. मात्र त्यांना धर्मेंद्रजींना भेटू दिलं नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.
ईटाइम्सशी बोलताना मुमताज यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, "मी त्यांना बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. मात्र तिथल्या स्टाफने मला सांगितलं की ते व्हेटिंलेटरवर आहेत आणि कोणालाही त्यांना भेटण्याची परवानगी नाही. मी तिथे अर्धा तास बसून होते. मला वाटलं होतं की मला धर्मेंद्रजींना बघता येईल. पण ते शक्य झालं नाही. त्यांना न भेटताच मी परतले. मी त्यांना शेवटची २०२१ मध्ये भेटले होते. तेव्हा खूप छान भेट झाली होती. पण तीच शेवटची भेट ठरली. हेमाजी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मला वाईट वाटतंय. हेमाजी धर्मेंद्र यांच्यावर खूप प्रेम करायच्या. याचा त्यांना नक्कीच धक्का बसला असेल".
धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सनी देओलने त्यांना मुखाग्नी दिला. धर्मेंद्र यांच्या मागे त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर, दुसरी पत्नी हेमा मालिनी, मुलगा सनी देओल आणि बॉबी देओल, मुली अजीता, विजेता, अहाना आणि ईशा आणि १६ नातवंडे असा परिवार आहे.