भरदिवसा रिक्षाचालकाकडून गैरवर्तन, बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार, म्हणाली-"माझा हात पिरगळला, मारहाण केली अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 10:32 IST2025-11-05T10:27:24+5:302025-11-05T10:32:30+5:30
मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी हात पिरगळला अन् मग मारहाण केली; दिवसाढवळ्या रिक्षाचालकाचं अभिनेत्रीसोबत केलं असं काही...

भरदिवसा रिक्षाचालकाकडून गैरवर्तन, बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार, म्हणाली-"माझा हात पिरगळला, मारहाण केली अन्..."
Bollywood Actress Shamim Akbar Ali: मनोरंजनविश्वातल्या अनेक अभिनेत्रींबरोबर बऱ्याचदा गैरवर्तन किंवा अश्लील कृत्य घडल्याच्या घटना समोर येत असतात. त्याबद्दल काही कलाकार हे मनमोकळेपणाने सांगतात. तर काहीजण मौन बाळगतात.अशातच बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईसारख्या ठिकाणी भरदिवसा या अभिनेत्रीसोबत रिक्षाचालकाने गैरवर्तन केल्याचं तिने सांगितलं आहे. शमीम अकबर अली असं या अभिनेत्रीचं नाव आहे.ही घटना १ नोव्हेंबर रोजी मुंबईतील बांद्रा या ठिकाणी दुपारच्या सुमारास घडली.
बॉलिवूड अभिनेत्री शमीम अकबर अलीला मीरा रोड या ठिकाणी एका रिक्षाचालकाडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित यंत्रणांकडून याचा तपास सुरु आहे.
दरम्यान, या घडलेल्या प्रकरणाविषयी मिड-डेशी बोलताना शमीम म्हणाली, मी जिममधून घरी परतत होते आणि माझ्या मुलीच्या शाळेबाहेर ऑटो थांबवली. ड्रायव्हरला राग आला आणि रिक्षा येथे का थांबवायला लावली, असे विचारत त्याने मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्याने घाईत असल्याने मी रिक्षा भाडे ताबडतोब द्यावे अशी मागणी केली. मी माझ्या मुलीला पटकन शाळेतून घेतले आणि त्याच रिक्षात परत गेलो आणि त्याला आम्हाला घरी सोडण्यास सांगितलं.
यापुढे शमीमने सांगितलं, जेव्हा ते तिच्या सोसायटीच्या गेटवर पोहोचले तेव्हा परिस्थिती आणखी हाताबाहेर गेली. शाळेतून घरी येताना माझ्या मुलीने फाउंटन परिसरात जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मी तिला सांगितलं की, आपण दुसऱ्या ऑटोने जाऊ. त्यानंतर अचानक, तो रिक्षा ड्रायव्हर आक्रमक झाला. मी माझ्या मुलीसोबत रिक्षात असताना त्याने मागे वळून माझा उजवा हात धरला आणि तो पिरगळला.इतकंच नाहीतर त्याने मला माझ्यामुलीसमोर मारहाण केली." असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.
अभिनेत्री शमीम अकबर अलीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'इन द मंथ ऑफ जुलै' या हिंदी चित्रपटात ती झळकली आहे. मात्र,त्यानंतर अभिनेत्री सिनेसृष्टीपासून दुरावली.