आर्यन खानला मोठा दिलासा! NCBकडून क्लीन चिटला आव्हान देणारी याचिका परत, न्यायालय म्हणाले,...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 18:58 IST2022-12-21T18:56:06+5:302022-12-21T18:58:35+5:30
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रुज ड्रग्ज प्रकरणात नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरोने क्लीन चीट मिळाली आहे. पण याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

आर्यन खानला मोठा दिलासा! NCBकडून क्लीन चिटला आव्हान देणारी याचिका परत, न्यायालय म्हणाले,...
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रुज ड्रग्ज प्रकरणात नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरोने क्लीन चीट मिळाली आहे. पण याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका हिंदू महासंघाने दाखल केली होती. आता ही याचिका पाठिमागे घेण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फक्त पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. (Aryan Khan Cordelia cruise drugs Case)
दरम्यान, आर्यन खानला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीने आर्यन खानला दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणारी याचिका याचिकाकर्त्याने मागे घेतली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी याचिकाकर्त्याला याचिकेचे जनहित विचारले आहे. ही याचिका फक्त प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर याचिकाकर्ते हिंदू महासंघाने आपली याचिका मागे घेतली आहे.
24 वर्षीय आर्यन खानला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. त्याच्यासह इतरही अनेकांवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप असून त्यांना अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळण्यापूर्वी आर्यन खान 20 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात होता. शाहरुख खानने मुलगा आर्यनचीही तुरुंगात भेट घेतली. आर्यन खानला या प्रकरणात जामीन मिळाला. मात्र त्याच्यावरील सर्व आरोप चुकीचे सिद्ध झाल्याने आता त्याला एनसीबीकडून क्लीन चिट मिळाली आहे.