महेंद्र सिंह धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 17:33 IST2018-07-04T17:30:20+5:302018-07-04T17:33:05+5:30

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

MS Dhoni: The Untold Story sequel is coming, Sushant Singh Rajput likely to return | महेंद्र सिंह धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

महेंद्र सिंह धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धोनीच्या जीवनावर आधारित 'एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाने भरभरुन प्रेम मिळवल्यावत आता या सिनेमाचा सीक्वल तयार करण्याचं काम सुरु आहे. 

टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत असलेल्या धोनीची भूमिका अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने साकारली होती. आता तो पुन्हा या सिनेमाच्या सीक्वलमध्ये दिसणार असल्याचं समजतं. या सिनेमात धोनीचा कर्णधार होण्यापासूनचा तर टी-20 मधून सन्यास हा प्रवास दाखवला जाणार असल्याची माहिती मिळते. त्यासोबतच वर्ल्ड कपमध्ये मिळवलेला विजयही यात दाखवण्याची शक्यता आहे.

कर्णधार झाल्यानंतर त्याने मिळवलेलं यश या सीक्वलमधून दाखवण्यात येणार असल्याचं समजतं. धोनी हा आता टीम इंडियाचा कर्णधार नसला तरी त्याने केलेल्या दमदार खेळामुळे आणि आपल्या कूल इमेजमुळे त्याची लोकप्रियता जराही कमी झाली नाहीये. त्यामुळे आता येणारा सीक्वल कसा असेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. मीडिया रिपोरनुसार, 2019 मध्ये  'एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाच्या सीक्वलचं काम सुरु होईल.
 

Web Title: MS Dhoni: The Untold Story sequel is coming, Sushant Singh Rajput likely to return