'तुझी कंबरना', बॉडी शेमिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांची मृणाल ठाकूरने केली अशी बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 15:32 IST2022-02-26T15:32:03+5:302022-02-26T15:32:32+5:30
अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) तिचा आगामी चित्रपट 'जर्सी'(Jersey Movie)मुळे चर्चेत आहे.

'तुझी कंबरना', बॉडी शेमिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांची मृणाल ठाकूरने केली अशी बोलती बंद
अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur)ने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. शेवटची ती अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'धमाका' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील त्यांचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. सध्या ती तिचा आगामी चित्रपट जर्सी (Jersey Movie)मुळे चर्चेत आहे. मृणाल ठाकूर 'जर्सी'मध्ये अभिनेता शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये शाहिद आणि मृणालची केमिस्ट्री लोकांना आवडली आहे. दरम्यान, मृणाल बॉडी शेमिंगची शिकार झाल्याचे दिसून आले. या अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
खरेतर, नुकताच मृणाल ठाकूरचा किक बॉक्सिंग करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये मृणाल तिच्या ट्रेनरसोबत किक बॉक्सिंग करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना 'रेगुलर डे' असे कॅप्शन लिहिले आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर अनेक सेलेब्सनी कमेंट करत तिची खूप प्रशंसा केली. त्याच वेळी, काही लोकांना मृणालची ही शैली अजिबात आवडली नाही आणि त्यांनी अभिनेत्रीला बॉडी शेमिंग करून ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेक युजर्सनी अश्लील कमेंटही केल्या आहेत.
अभिनेत्रीला ट्रोल करताना एका यूजरने कमेंट केली की, 'तुझी कंबर मटक्यासारखी आहे.' तर एका यूजरने अभिनेत्रीला 'शरीराच्या खालच्या भागाचे वजन कमी करण्याचा सल्ला दिला.' हे वाचून अभिनेत्री गप्प बसली नाही. तिने त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिने पण यात आनंंदी आहे असे म्हटले आहे. तिने त्या व्यक्तीला टॅग करत लिहिले की, काहीजण त्यासाठी पैसे मोजतात. तर काहींना नॅचरली असते.आपण सगळे बॉडी फ्लॉन्ट करतो. तुम्हीही करा.