"हृतिकला पाहून माझ्या एक्स बॉयफ्रेंडचा जळफळाट झालेला...", मृणाल ठाकुरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:58 IST2026-02-19T12:57:07+5:302026-02-19T12:58:52+5:30

मृणालला हँडसम माणसांसोबत पाहून तो..., काय म्हणाली अभिनेत्री?

mrunal thakur reveals her ex boyfriend felt insecure about hrithik roshan started working out lost 15 kgs | "हृतिकला पाहून माझ्या एक्स बॉयफ्रेंडचा जळफळाट झालेला...", मृणाल ठाकुरचा खुलासा

"हृतिकला पाहून माझ्या एक्स बॉयफ्रेंडचा जळफळाट झालेला...", मृणाल ठाकुरचा खुलासा

मृणाल ठाकुर सध्याची सर्वांची आवडती अभिनेत्री आहे. 'सीतारामम' सिनेमातून तिने सर्वांना प्रेमातच पाडलं. मृणाल ठाकुर आगामी 'दो दीवाने शहर मे' सिनेमात सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मृणालचं नाव धनुषसोबत जोडलं जात होतं. मात्र त्या अफवा असल्याचं तिने स्पष्ट केलं. तसंच प्रेम, लग्न यावर तिने भाष्यही केलं. आता मृणालने नवा खुलासा केला आहे. तिचा एक्स बॉयफ्रेंड हृतिक रोशनवर जळायचा असं ती म्हणाली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

रौनक रजनीच्या युट्यूब चॅनलवर मृणाल ठाकुरने किस्सा सांगितला. ती म्हणाली, "माझा बॉयफ्रेंड स्वीडनचा होता. त्याला असं वाटायचं की मी हँडसम, गुड लूकिंग माणसांसोबत फिरते आणि शूट करते. त्यामुळे मग त्यानेही वर्क आउट सुरु केलं. त्याने हृतिकप्रमाणेच १५ ते १७ किलो वजन कमी केलं. नंतर मला समजलं की त्याने एका पॉइंटला वर्क आउट करणं बंद केलं आणि खूप खायला सुरुवात केली. २० किलो वजन वाढवलं. मला काय सुरु आहे काहीच कळलं नाही. मग शेवटी त्याने माझ्यासमोर मान्य केलं की तो हृतिकचा मुकाबला करुन आता थकला आहे."

ती पुढे म्हणाली, "माझं असं झालं की अरे मी तर याला असं काहीही करायला सांगितलंच नव्हतं. मी हँडसम लोकांसोबत हँगआउट करते याची त्यालाच इर्ष्या वाटत होती."

धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल म्हणाली, "मला वाटतं १४ फेब्रुवारी म्हणजे नवा एप्रिल फूल डे आहे. माझ्याबद्दलच्या या अफवा कोणी सुरु केल्या माहित नाही. पहिली गोष्ट मी कुठेही काहीही वक्तव्य केले नव्हते तरी माझं वक्तव्य असं म्हणत बातम्या चालवण्यात आल्या. मृणाल असं म्हणाली हेच बोललं गेलं. हे खरोखर भयावह आहे."

Web Title : मृणाल ठाकुर का खुलासा: ऋतिक को देखकर जलते थे मेरे एक्स-बॉयफ्रेंड!

Web Summary : मृणाल ठाकुर ने बताया कि उनके एक्स-बॉयफ्रेंड को उनके हैंडसम पुरुषों के साथ काम करने से जलन होती थी। उन्होंने ऋतिक रोशन जैसा बनने की भी कोशिश की, फिर हार मान ली और वजन बढ़ा लिया। धनुष से शादी की अफवाहें झूठी हैं।

Web Title : Mrunal Thakur reveals ex-boyfriend's jealousy of Hrithik Roshan's looks.

Web Summary : Mrunal Thakur disclosed her ex-boyfriend's jealousy regarding her working with handsome men. He even tried to emulate Hrithik Roshan's physique, then gave up, gaining weight. She clarified rumors about marrying Dhanush are false.