थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर धडपडतच बाहेर आली मौनी रॉय, Video पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 18:16 IST2025-01-01T18:15:54+5:302025-01-01T18:16:41+5:30
सध्या अभिनेत्री मौनी रॉय हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर धडपडतच बाहेर आली मौनी रॉय, Video पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Mouni Roy : सगळीकडे नव्या वर्षाचा उत्साह दिसत आहे. नव्या वर्षाकडून खूप अपेक्षा आहेत. जुन्या वर्षाला निरोप देताना काल अनेक ठिकाणी पार्ट्या झाल्या. थर्टी फर्स्टची रात्र अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न झाला. बॉलिवूड सेलिब्रिटींनी थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन केलं आणि नव्या वर्षाचं स्वागत केलं. अनेक बॉलिवूड स्टार्स हे त्यांच्या मित्रांसोबत पार्टी करताना मुंबईतील विविध ठिकाणी स्पॉट झाले. सध्या अभिनेत्री मौनी रॉय हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतरचा मौनी रॉय हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ती नशेत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. हा व्हिडीओ पाहून सध्या सगळीकडे मौनी रॉय हिचीच चर्चा सुरु झाली आहे. व्हिडीओमध्ये मौनी रॉय ही धडपडताना दिसतेय. यावेळी तिचा पती सुरज तिला सांभाळतो आणि गाडीत बसवतो. यावेळी मौनी ही ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय. तर तिच्यासोबत तिची बेस्ट फ्रेंड अभिनेत्री दिशा पाटनीदेखील पाहायला मिळतेय.
मौनी रॉय हिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. "झेपत नाही तर इतकी प्यायची तरी कशाला", "फॅशनचा पोपट झाला", अशा कमेंट काहींनी केल्यात. तर मौनींच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर मौनी 'सलाकार'मध्ये दिसणार आहे. फारुख कबीर हे सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. याशिवाय ती अहमद खान दिग्दर्शित 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसणार आहे.