Monalisa : "मी काहीतरी खाऊन मरून जाईन"; मोनालिसाच्या आईचा टाहो, हात जोडून केली 'ही' विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:40 IST2026-03-17T11:34:38+5:302026-03-17T11:40:16+5:30

Monalisa : प्रयागराज महाकुंभमधून प्रसिद्धीझोतात आलेली सोशल मीडिया स्टार मोनालिसा हिने फरमान खानशी लग्न केल्यापासून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Monalisa mother cried missing daughter father emotional no contact after marriage slams farman khan | Monalisa : "मी काहीतरी खाऊन मरून जाईन"; मोनालिसाच्या आईचा टाहो, हात जोडून केली 'ही' विनंती

Monalisa : "मी काहीतरी खाऊन मरून जाईन"; मोनालिसाच्या आईचा टाहो, हात जोडून केली 'ही' विनंती

प्रयागराज महाकुंभमधून प्रसिद्धीझोतात आलेली सोशल मीडिया स्टार मोनालिसा हिने फरमान खानशी लग्न केल्यापासून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मोनालिसाचे आई-वडील, आजी, काका आणि बहीण यांची अवस्था रडून-रडून अत्यंत वाईट झाली आहे. मात्र मोनालिसा सध्या केरळमध्ये पती फरमानसोबत नवीन आयुष्य जगत आहे. आपल्या प्रेमासाठी तिने कुटुंबाचा त्याग केला आहे. तिच्या घरच्यांनी या लग्नाला 'लव्ह जिहाद' असं म्हटलं.

लेकीच्या विरहाने मोनालिसाची आई व्याकूळ झाली आहे. गेल्या १० दिवसांपासून तिचं मुलीशी बोलणं झालेलं नाही आणि तिचे दोन्ही फोन बंद आहेत. "माझी मुलगी परत आली नाही, तर मी काहीतरी खाऊन मरून जाईन" असा इशारा दिला आहे. मोनालिसा तिकडे फरमानच्या घरी आनंदात असली, तरी महेश्वरमधील तिच्या घरी सर्वजण खूप दु:खी आहेत.

"मोनालिसा अल्पवयीन, २००९ मध्ये जन्म, मुद्दाम वाढवलं वय..."; काकांचा खळबळजनक खुलासा

मोनालिसाच्या आईचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या माध्यमांसमोर हात जोडून मुलीला परत आणण्याची विनंती करत आहेत. "तिच्याकडे सध्या मोबाईल नाही, मी तिच्याशी कशी बोलणार? ती अजून लहान आहे, तिला काही समजत नाही. तिला कोणीतरी फसवलं आहे," असा आरोपही आईने केला आहे. बोलता बोलता त्या जमिनीवर पडल्या आणि बेशुद्ध झाल्या.

मोनालिसाच्या लग्नाचं PFI कनेक्शन, दिग्दर्शक सनोज मिश्रांचा मोठा दावा; मोदींकडे मागितला न्याय

 "मी जेलमध्ये गेलो, माझ्यावर ९.५ कोटींचं कर्ज; मोनालिसा अशिक्षित ..."; दिग्दर्शकाचा गंभीर आरोप

मोनालिसाच्या वडिलांनी सांगितलं की, लेकीचा फोन लागत नाही आणि ती कोणाशीही संपर्क साधत नाही. तिच्या धाकट्या बहिणीनेही लग्नानंतर एकदाही बोलणं झालं नसल्याचं स्पष्ट केलं. मोनालिसावर सध्या लग्नामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात असून तिला ट्रोलही केलं जात आहे. तिचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

Web Title : मोनालिसा की माँ ने आत्महत्या की धमकी दी; बेटी की वापसी की गुहार।

Web Summary : सोशल मीडिया स्टार मोनालिसा की फरमान खान से शादी से उसका परिवार सदमे में है, जिसने 'लव जिहाद' का आरोप लगाया है। उसकी व्याकुल माँ ने आत्महत्या करने की धमकी दी है अगर मोनालिसा नहीं लौटती, और दावा किया कि उसे हेरफेर किया जा रहा है। परिवार संपर्क के लिए बेताब है।

Web Title : Monalisa's mother threatens suicide; pleads for daughter's return.

Web Summary : Social media star Monalisa's marriage to Farman Khan shocks her family, who allege 'Love Jihad'. Her distraught mother threatens suicide if Monalisa doesn't return, claiming she is being manipulated. The family is desperate for contact.