Monalisa : "मला १० वेळा चुकीचा स्पर्श केला, अत्यंत घाणेरडा माणूस"; मोनालिसाचा सनोज मिश्रांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:41 IST2026-03-25T13:40:24+5:302026-03-25T13:41:36+5:30
Monalisa And Sanoj Mishra : मोनालिसाने दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

Monalisa : "मला १० वेळा चुकीचा स्पर्श केला, अत्यंत घाणेरडा माणूस"; मोनालिसाचा सनोज मिश्रांवर गंभीर आरोप
महाकुंभमुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आलेल्या मोनालिसाला चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी स्टार बनवलं. आपल्या 'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटात त्यांनी तिला हिरोईन म्हणून घेतलं आणि अभिनयाचं ट्रेनिंग दिलं. मात्र फरमान खानशी लग्न केल्यानंतर मोनालिसाचं कुटुंब आणि सनोज मिश्रा यांनी 'लव्ह जिहाद'चं नाव देऊन या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. या संपूर्ण वादावर मोनालिसाने पत्रकार परिषद घेत सनोज मिश्रा यांनाच धारेवर धरलं आहे.
मोनालिसाने दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तिने सांगितलं की, सनोज मिश्रा यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने याबद्दल आपल्या कुटुंबाला सांगितलं आणि विरोध केला, तेव्हा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट मोनालिसाला गप्प राहण्यास सांगण्यात आलं. केरळमध्ये माध्यमांशी बोलताना मोनालिसा म्हणाली, "माझ्याकडे आणि फरमानकडे आता फक्त एकच मार्ग उरला आहे, तो म्हणजे आत्महत्या. जर दिल्ली आणि मध्य प्रदेश सरकारने आम्हाला मदत केली नाही, तर आम्ही दोघंही आत्महत्या करू. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. आम्हाला उघडपणे मारण्याच्या आणि कापून टाकण्याच्या धमक्या मिळत आहेत. आमचे पोस्टर्स जाळले जात आहेत. मी सरकारला हात जोडून विनंती करते की त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा."
"तो अभिनेता नाही..."; 'लव्ह जिहाद' म्हणणाऱ्या सनोज मिश्रांनी सांगितलं मोनालिसाच्या नवऱ्याचं सत्य
"सनोज मिश्रा अत्यंत नीच माणूस"
"सनोज मिश्रा म्हणत आहेत की, मला मोनालिसाचं नाव घेताना लाज वाटते आणि आणि ती माझ्या चित्रपटाचा भाग असणार नाही. खरं तर मला स्वतःलाच त्यांच्या चित्रपटाचा भाग व्हायचं नाही. कारण तो अत्यंत नीच माणूस आहे. त्याचं नाव घेताना मला लाज वाटते. तो लहान मुलींना चित्रपटाचं आमिष दाखवून त्यांची छेड काढतो. मी तुला हा रोल देईन, तो रोल देईन असं आश्वासन देऊन चित्रपटांच्या नावाखाली चुकीचं काम करतो."
"मी काहीतरी खाऊन मरून जाईन"; मोनालिसाच्या आईचा टाहो, हात जोडून केली 'ही' विनंती
"माझ्यावर अन्याय झाला, मला न्याय हवा"
"सनोज मिश्रा अजिबात चांगला माणूस नाही. अत्यंत घाणेरडा माणूस आहे. त्याने मला १० वेळा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. जेव्हा मी याबद्दल माझ्या कुटुंबाला सांगितलं, तेव्हा त्यांनी माझी साथ दिली नाही. माझ्यावर काय प्रसंग ओढवला आहे, हे फक्त मलाच माहीत आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे आणि मला न्याय हवा आहे. सनोजने जेव्हा मला स्पर्श केला, तेव्हा घरचे म्हणालं की हा तुझा पहिला चित्रपट आहे. मग काय पहिल्या चित्रपटासाठी माझ्यावर बलात्कार होऊ द्याल का?" मोनालिसाच्या या आरोपांवर दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही.
"मोनालिसा अल्पवयीन, २००९ मध्ये जन्म, मुद्दाम वाढवलं वय..."; काकांचा खळबळजनक खुलासा
"मी जेलमध्ये गेलो, माझ्यावर ९.५ कोटींचं कर्ज; मोनालिसा अशिक्षित ..."; दिग्दर्शकाचा गंभीर आरोप
मोनालिसा आणि फरमानच्या लग्नाचा सर्वात मोठा धक्का सनोज मिश्रा यांना बसला होता. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, मोनालिसाने त्यांच्या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच संकटात टाकलं आहे. चित्रपटातील एक गाणं मोनालिसासोबत चित्रित होणार होतं, पण आता ते तिच्यासोबत काम करणार नाहीत. सनोज यांनी असंही म्हटलं होतं की, आता त्यांचा चित्रपट प्रदर्शित होणं खूप कठीण आहे. त्यांनी महेश्वर येथे जाऊन मोनालिसाच्या कुटुंबाची भेट घेतली होती आणि पोलिसात जाऊन मोनालिसा-फरमान विरुद्ध 'लव्ह जिहाद'ची तक्रारही दाखल केली होती.