तीन वर्षांंपूर्वी गायिका मोनाली ठाकूर अडकली लग्न बेडीत, आता केला हा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 13:31 IST2020-06-12T13:12:32+5:302020-06-12T13:31:03+5:30
'मोह मोह के धागे’ या गाण्यामुळे मोनाली ठाकूर लाईमलाईटमध्ये आली.

तीन वर्षांंपूर्वी गायिका मोनाली ठाकूर अडकली लग्न बेडीत, आता केला हा खुलासा
मोनालीने ठाकूरने आपल्या गोड आवाजाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ‘मोह मोह के धागे’ या गाण्यामुळे मोनाली ठाकूर लाईमलाईटमध्ये आली. तिला या गाण्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले. मोनाली ठाकूरने तिच्या लग्नाच्या चर्चांवर पडदा उचलला आहे. मोनालीने बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याचा खुलासा करत सगळ्यांना धक्का दिला होता. तीनवर्षांपासून मोनालीने आपल्या लग्नाला सीक्रेट ठेवले. ऐवढेच काय तर तिच्या बॉलिवूडमधील मित्र-मैत्रिणींनादेखील याची माहिती नव्हती. तिने कोणाला लग्नाचे आमंत्रण देखील दिले नव्हते. तीन वर्षांपूर्वी मोनाली ठाकूरने बॉयफ्रेंड माइक रिचरसोबत सीक्रेट मॅरेज केले आहे.
सध्याची परिस्थिती सामान्य झाल्यावर मोनाली जवळच्या लोकांना बोलवून छोटासा समारंभ करण्याचा विचार करते आहे. माझा मित्र परिवार माझ्यावर नाराज असेल पण जोवर त्यांना लग्नाचे निमंत्रण देऊन तोपर्यंत नाराजी दूर झालेली असेल.
माइक रिचरबाबत बोलताना मोनाली म्हणाली, ''माझी ओळख माइकशी स्वित्झर्लंड ट्रिप दरम्यान झाली. भेटीदरम्यान आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ आलो. माइकने मला त्या झाडाच्या खालून प्रपोज केले होते ज्याठिकाणी आमची पहिली भेट झाली होती. '' मोनालीने 2017 मध्ये लग्न केले आहे.