अक्षय कुमारने माफी मागितल्यावर मिलिंद सोमणचं ट्विट, वाचा काय म्हणाला तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 16:53 IST2022-04-22T16:53:02+5:302022-04-22T16:53:32+5:30

Milind Soman Tweet On Akshay Kumar Advt : अक्षय कुमार (Akshay Kumar) पहिल्यांदाच अजय देवगण आणि शाहरूख खानसोबत विमल वेलचीच्या जाहिरातीत दिसला होता. त्यानंतर तो या जाहिरातीमुळे ट्रोल झाला होता.

Milind Soman tweet after Akshay Kumar apology post on Vimal elaichi advt | अक्षय कुमारने माफी मागितल्यावर मिलिंद सोमणचं ट्विट, वाचा काय म्हणाला तो?

अक्षय कुमारने माफी मागितल्यावर मिलिंद सोमणचं ट्विट, वाचा काय म्हणाला तो?

अक्षय कुमारच्या विमल वेलचीच्या जाहिरातीवरून अभिनेता मिलिंद सोमण याने ट्विट केलं आहे. जाहिरातीमुळे ट्रोल झाल्यानंतर अक्षय कुमारने चाहत्यांची माफी मागितली होती. त्यावर सेलिब्रिटींच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही आल्या होत्या. अजय देवगण यानेही प्रतिक्रिया दिली होती. आता यावरून मिलिंद सोमण (Milind Soman) याने ट्विट केलं आहे. 

अक्षय कुमार पहिल्यांदाच अजय देवगण आणि शाहरूख खानसोबत विमल वेलचीच्या जाहिरातीत दिसला होता. त्यानंतर तो या जाहिरातीमुळे ट्रोल झाला होता. अशात त्याने वाद पेटताना दिसल्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून जाहिरपणे माफी मागितली होती. तसेच त्याने यातून मिळालेले पैसे दान करत असल्याचेही सांगितलं होतं. माफी मागितल्यापासून त्याची चर्चा सुरू आहे. 

अक्षय कुमारने जाहिरातीसाठी माफी मागितल्यावर मिलिंद सोमणन ट्विट केलं. त्याने ट्विट करून अक्षयला पाठींबा दिला. त्याने लिहिलं की, 'अक्षय तू योग्य केलं. कारण जे काही असो'. मिलिंदच्या या ट्विटवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत. 

मिलिंद सोमणआधी रामायण मालिकेतील लक्ष्मण सुनील लहरी यांनी अक्षय कुमारचं कौतुक केलं. त्यानी अक्षयच्या पोस्टसोबत लिहिलं की, अक्षय एक सज्जन व्यक्ती आहे. ही पोस्ट या गोष्टीचा पुरावा आहे. तेच पहलाज निहलानी यांनी अक्षय कुमारवर टिका केली. ते म्हणाले की, अक्षयला काय कमी आहे की, त्याने ही जाहिरात केली.

Web Title: Milind Soman tweet after Akshay Kumar apology post on Vimal elaichi advt