Mika Singh : चिंटिंग करताना गर्लफ्रेंडने रंगेहाथ पकडलं अन् मिका सिंगच्या थेट लगावली होती कानफडात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:52 IST2024-06-10T13:51:52+5:302024-06-10T13:52:31+5:30
मिका सिंग हा सिनेइंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध गायक आहे.

Mika Singh : चिंटिंग करताना गर्लफ्रेंडने रंगेहाथ पकडलं अन् मिका सिंगच्या थेट लगावली होती कानफडात
बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक मिका सिंगचा आज ४७वा वाढदिवस. मस्तमौला अंदाज, हटके आवाज आणि कायम वादामध्ये अडकलेला गायक म्हणून मीकानं त्याची ओळख निर्माण केली आहे. मिका सिंग हा सिनेइंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध गायक आहे. आपल्या आवाजाच्या बळावर त्याने कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. पण तुम्हाला माहितेय एकदा मिका सिंगला त्याच्या गर्लफ्रेंडने रंगेहाथ पकडलं होतं आणि थेट कानफडात लगावली होती. विशेष म्हणजे या गोष्टीचा खुलासा खुद्द मिका सिंगने केला होता.
'स्वयंवर मिका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) या कार्यक्रमात मिका सिंगने त्याच्याबाबतचे अनेक किस्से शेअर केले होते. याच कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये मिका सिंगने एक्स गर्लफ्रेंडकडून कानाखाली खाल्ल्याचं सांगितलं होतं. मिका सिंग म्हणाला होता, 'माझी एक गर्लफ्रेंड होती. ती खूप सुंदर होती. मी त्यावेळी फ्लर्टी होतो. मी फोनवर इतर मुलींशीही बोलायचो आणि हे तिच्यापासून लपवायचो. एकदा तिच्यासोबत असतानाच मला राजेश नावाने सेव्ह असलेल्या नावावरुन कॉल केला. तिने मला तो फोन उचलायला सांगितला. मी तो फोन उचलल्यावर तिने मला जोरात कानाखाली मारली'. यानंतर आपण सुधारल्याचं मिका सिंगने सांगितलं.
मीकानं बॉलिवूडबरोबर पंजाबी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. 'ऑंख मारे', 'राणी तू में राजा', 'आज की पार्टी' मिका सिंगची गाजलेली गाणी आजही पार्टी आणि कार्यक्रमांत वाजतात. मीका याचा जन्म पश्चिम बंगालमधील दुर्गापूर इथं झाला. मीका सिंह पंजाबी सिनेमातील प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी याचा भाऊ आहे. मीकानं त्याच्या करीअरची सुरुवात गिटारिस्ट म्हणून केली होती. मीका सिंग याचं खरं नाव अमरीक सिंह आहे. आपल्या आवाजाच्या बळावर त्याने कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे.