#Metoo : माझा पती इतका वाईट होता तर मैत्री का ठेवलीस? कंगना राणौतवर बरसली विकास बहलची पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 22:23 IST2018-10-12T22:21:27+5:302018-10-12T22:23:26+5:30
विकास बहलची पत्नी ऋचा दुबे आपल्या पतीच्या बाजूने मैदानात उतरली आहे. केवळ इतकेच नाही तर कंगनावर तिने जोरदार हल्ला चढवला आहे.

#Metoo : माझा पती इतका वाईट होता तर मैत्री का ठेवलीस? कंगना राणौतवर बरसली विकास बहलची पत्नी
एका महिला क्रू मेंबरने दिग्दर्शक विकास बहलवर गैरतर्वनाचे गंभीर आरोप केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत ही तिच्या पाठीशी उभी राहणारी पहिली व्यक्ती होती. कंगनानेही विकास बहलच्या वाईट कृत्याचा पाढा वाचला होता. यापाठोपाठ अनेकजण विकास बहलच्या विरोधात समोर आले होते. आता या संपूर्ण वादात विकास बहलची पत्नी ऋचा दुबे आपल्या पतीच्या बाजूने मैदानात उतरली आहे. केवळ इतकेच नाही तर कंगनावर तिने जोरदार हल्ला चढवला आहे.
This is gone beyond tolerance now ! Do not misuse #metoo#fairchance#vikasbahlpic.twitter.com/YfMFlOOaPu
— richa dubey (@richviks) October 12, 2018
माझा पती इतका वाईट आहे तर मग तितकी वर्षे तू त्याच्याशी मैत्री का ठेवलीस? असा प्रश्न ऋचाने कंगनाला विचारला आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये मधु मंटेना व मसाबा गुप्ताच्या लग्नात कंगनाने विकाससोबत आयटम सॉन्गवर डान्स केला होता. विकास बहल इतका वाईट होता, मग तू त्याच्यासोबत डान्स कसा काय केलास? असा प्रश्नही ऋचाने विचारला आहे. विकास व कंगना यांत मैत्री होती. त्यांच्यात फ्रेंडली मॅसेज होत. मग अचानक कंगना विकासबद्दल इतके वाईट का बोलू लागली? त्याच्या वागण्या-बोलण्यावर आक्षेप होता तर ती यापूर्वी इतके खुलेपणाने का बोलली नाही़? ती यशस्वी होती, तिच्यावर कुठलाच दबाव नव्हता. मग ती चूप का राहिली? असे प्रश्नही ऋचाने विचारले आहेत. आता ऋचाच्या या प्रश्नांवर कंगना काय बोलते, ते बघूच.
विकास बहलवर गैरवर्तन आणि छेडछाडीचे आरोप झाल्यानंतर त्याच्या अनेक जवळच्या लोकांनी त्याच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. अनुराग कश्यप आणि विक्रम मोटवानी या विकासच्या बिझनेस पाटर्नरनीही विकासवर टीका केली आहे. एका वेबसीरिजमधून विकासची हकालपट्टी करण्यात आली आहे.