मेघना गुलजारने लिहिली दीपिका पादुकोणसाठी इमोशनल पोस्ट, वाचून तुम्हाला वाटेल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 16:38 IST2019-03-02T16:32:12+5:302019-03-02T16:38:48+5:30
दीपिका पादुकोण लवकरच मेघना गुलजारच्या छपाक सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सिनेमाचे शूटिंग सुरु होण्यापूर्वी मेघनाने दीपिकासाठी एक इमोनशल पोस्ट लिहिली आहे.

मेघना गुलजारने लिहिली दीपिका पादुकोणसाठी इमोशनल पोस्ट, वाचून तुम्हाला वाटेल कौतुक
ठळक मुद्दे मला वाटले नव्हते दीपिका या सिनेमासाठी होकार देईल- मेघना गुलजार मेघना गुलजार 'राजी', 'तलवार' अशा दमदार चित्रपटांसाठी ओळखली जाते
दीपिका पादुकोण लवकरच मेघना गुलजारच्या छपाक सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सिनेमाचे शूटिंग सुरु होण्यापूर्वी मेघनाने दीपिकासाठी एक इमोनशल पोस्ट लिहिली आहे. मला वाटले नव्हते दीपिका या सिनेमासाठी होकार देईल. तिने होकार देणे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.
#Chhapaak director Meghna Gulzar about Deepika Padukone ❤ pic.twitter.com/13867zS05R
— Deepika Padukone FC (@DeepikaPFC) 1 March 2019
मेघना गुलजारने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, दीपिकाला भेटणं माझ्यासाठी नशीबाची गोष्ट होती. दीपिका भेटण्याआधी माझ्या मनात अनेक शंका होत्या. कारण मी तिच्याकडे ज्याप्रकारच्या सिनेमाची ऑफर घेऊन जातेय तो करण्यासाठी ती होकार देईल का? लागोपाठ तीन इमोशन सिनेमा केल्यानंतर ती हलकाफुलका सिनेमा करायचा होता. मात्र माझ्याकडे तिच्यासाठी लाईट आणि रोमाँटिक स्क्रिप्ट नव्हती. माझ्या सिनेमाची कथा तर अशा स्त्रीची होती, जिनं आयुष्यातल्या आव्हानांना समर्थपणे तोंड दिलं होते.
मेघना पुढे लिहिते, दीपिका या भूमिकेसाठी मला परफेक्ट वाटली. पटकथा ऐकल्यानंतर दीपिकाने एक क्षणात सिनेमाला,त्या भूमिकेला आणि मला स्वीकारले. तिनं विनोदानं म्हटलं, या सिनेमात काम करताना मला लाल मिरची आणि मीठ लावून कैरी खायला मिळणार आहे म्हणून मी सिनेमा स्वीकारला.
मेघना गुलजार 'राजी', 'तलवार' अशा दमदार चित्रपटांसाठी ओळखली जाते. मेघनाच्या 'राजी' या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल दिसले होते. मेघनाचा हा चित्रपट समीक्षक व प्रेक्षक दोघांनीही डोक्यावर घेतला होता. 'राजी'नंतर मेघना अॅसिड हल्ल्यासारख्या संवेदनशील मुद्यावर चित्रपट घेऊन येतेय.