कंगना राणौतसोबतच्या वादानंतर आता पत्रकार टाकणार का जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या प्रमोशनवर बहिष्कार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 20:04 IST2019-07-09T20:03:13+5:302019-07-09T20:04:09+5:30

कंगनाने एका पत्रकारासोबत ‘पंगा’ घेतला होता. भर पत्रकार परिषदेत एका पत्रकारासोबत ती जोरदार भांडली होती.

Media demands apology from Bollywood star Kangana Ranaut | कंगना राणौतसोबतच्या वादानंतर आता पत्रकार टाकणार का जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या प्रमोशनवर बहिष्कार?

कंगना राणौतसोबतच्या वादानंतर आता पत्रकार टाकणार का जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या प्रमोशनवर बहिष्कार?

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेच्या संदर्भात काही ज्येष्ठ पत्रकारांनी या चित्रपटाची निर्माती एकता कपूरची नुकतीच भेट घेतली आणि कंगनाने जाहीर माफी मागावी अन्यथा या चित्रपटाच्या प्रमोशनवर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे. 

कंगना राणौतचा कुठलाही चित्रपट येवो, वाद हा ठरलेलाच. नव्या चित्रपटासोबतच्या प्रदर्शनासोबत जुने वाद आणि बॉलिवूडवर आगपाखड करण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. लवकरच कंगनाचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि कंगना यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी तिने काय केले तर एका पत्रकारासोबत ‘पंगा’ घेतला. भर पत्रकार परिषदेत एका पत्रकारासोबत ती जोरदार भांडली होती.

पीटीआय वृत्तसंस्थेचे पत्रकार जस्टीन राव यांनी पत्रकार परिषदेत कंगनाला प्रश्न विचारला होता. प्रश्न विचारण्याआधी त्यांनी आपले नाव सांगितले असता त्यांचे नाव ऐकून कंगनाला तिच्याबद्दल लिहिलेली एक बातमी आठवली. ‘मणिकर्णिका’च्या प्रदर्शनावेळी तिच्याबद्दल ही बातमी लिहिण्यात आली होती. मग काय, क्षणात कंगनाचा पारा चढला आणि तिने पत्रकारावर हल्लाबोल केला.

जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत घडलेल्या घटनेनंतर आता कंगनाने जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेच्या संदर्भात काही ज्येष्ठ पत्रकारांनी या चित्रपटाची निर्माती एकता कपूरची नुकतीच भेट घेतली आणि कंगनाने जाहीर माफी मागावी अन्यथा या चित्रपटाच्या प्रमोशनवर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे. 

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या वेळी जस्टिन राव माझी मुलाखत घ्यायला आले होते. ते तीन तास माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये होते. ते त्यावेळी माझ्यासोबत जेवले. पण तरीही माझ्या आणि माझ्या चित्रपटाबद्दल त्यांनी वाईट गोष्टी लिहिल्या. त्यांनी नंतर मला मॅसेजही केला होता, असे कंगना म्हणाली होती. तिच्या या आरोपानंतर जस्टीन राव यांनीही आपली बाजू मांडली होती. कंगनाने केलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळून लावले होते. पत्रकार नेहमी सत्य तेच लिहितात. मी तुझ्याविरोधात काहीही वाईट लिहिलेले नाही. मी कधीही तुझ्यासोबत जेवलेलो नाही आणि तुझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मी कधीच तीन तास घालवले नाहीत, असे जस्टीन राव म्हणाले. शिवाय मी तुझ्याविरोधात ट्वीट केले असेल तर त्याचा आणि तुला केलेल्या मॅसेजचा स्क्रिनशॉट दाखव, असे आव्हानही त्यांनी कंगनाला दिले. त्यांचा हा पवित्रा पाहून, मी हे नंतर शेअर करेल, असे कंगना म्हणाली होती.



 

Web Title: Media demands apology from Bollywood star Kangana Ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.