Mouni Roy Wedding: मौनी रॉयची हळद दणक्यात, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला जबरदस्त डान्स, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 22:49 IST2022-01-26T22:48:41+5:302022-01-26T22:49:08+5:30
Mouni Roy Wedding: टीव्हीवरील नागिन मौनी रॉय तिच्या जीवनातील नवा अध्याय सुरू करणार आहे. मौनी रॉय उद्या २७ जानेवारी रोजी तिचा बॉयफ्रेंड Suraj Nambiarसोबत विवाह करणार आहे. गोव्यामध्ये मौनी रॉयच्या विवाह सोहळ्याच्या विधींना सुरुवात झाली आहे.

Mouni Roy Wedding: मौनी रॉयची हळद दणक्यात, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला जबरदस्त डान्स, पाहा VIDEO
पणजी - टीव्हीवरील नागिन मौनी रॉय तिच्या जीवनातील नवा अध्याय सुरू करणार आहे. मौनी रॉय उद्या २७ जानेवारी रोजी तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत विवाह करणार आहे. गोव्यामध्ये मौनी रॉयच्या विवाह सोहळ्याच्या विधींना सुरुवात झाली आहे. मेहंदी आणि हळदीच्या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओंमध्ये मौनी रॉय तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत डान्स करताना दिसत आहे.
सप्तपदी घेण्यापूर्वी हे नवदाम्पत्य डान्स करताना सुंदर दिसत आहे. पिवळा लेहंगा आणी बॅकलेस चोळीमध्ये मौनी रॉय ग्लॅमसर दिसत आहे. तसेच ती बॉयफ्रेंडसोबत मेंहदी है रचने वाली या गाण्यावर डान्स करत होती. या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
गोव्यामध्ये सूरज आणि मौनीचं डेस्टिनेशन वेडिंग पार पडणार आहे. या लग्नसोहळ्यात कोविड प्रोटोकॉलमुळे, मोजक्या पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीत मौनीचा लग्न सोहळा रंगणार आहे. मात्र, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर लवकरच ही जोडी मुंबईत एक ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहेत.
मौनी रॉयचा प्रियकर सूरज नांबियार हा एक बँकर आहे. मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात मौनी तिच्या बहिणीच्या घरी दुबईमध्ये होती. त्याचवेळी तिची आणि सूरजची ओळख झाली होती.