'मसकली गर्ल' सोनम कपूरचं नवं घर पाहिलंत का? लंडन, दिल्लीतही आहे आलिशान 'पॅलेस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 11:08 IST2023-10-24T11:07:44+5:302023-10-24T11:08:31+5:30

सोनम कपूरने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत

masakali girl Sonam Kapoor shifted to new house shared photos of her luxurious home | 'मसकली गर्ल' सोनम कपूरचं नवं घर पाहिलंत का? लंडन, दिल्लीतही आहे आलिशान 'पॅलेस'

'मसकली गर्ल' सोनम कपूरचं नवं घर पाहिलंत का? लंडन, दिल्लीतही आहे आलिशान 'पॅलेस'

बॉलिवूडची 'मसकली गर्ल' सोनम कपूर (Sonam Kapoor) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. बिझनेस आनंद आहुजाची ती पत्नी असून त्यांना वायू हा मुलगाही आहे. सोनम खूपच आलिशान आयुष्य जगते हे आपण अनेकदा पाहिलंच आहे. लंडन, दिल्लीत तिचं आलिशान घर आहे. तर मुंबईतही वडील अनिल कपूरचं कपूर हाऊस महलपेक्षा कमी नाहीए. आता नुकतंच सोनम कपूरने आणखी एक घर घेतलं असून ती नवीन घरात शिफ्ट झाली आहे.

सोनम कपूरने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. गुलाबी ड्रेस, बिंदी, कानात झुमके अशा लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. खिडकीजवळ एका आरामदायी खुर्चीवर बसून तिने हे फोटोशूट केलंय. तर बाजूला मोठे पडदे आणि बॅकग्राऊंडला सुंदर नक्षीकाम केलेलं दिसतंय. सोनमने आपले फोटो शेअर करत नवीन घरात शिफ्ट झाल्याचं सांगितलं आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले,'या आठवड्यात आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो. आम्ही खूप उत्साहात आहोत आणि या नवीन घरात आठवणी तयार करण्यासाठी आम्ही फार आतुर आहोत.'


 
नवरात्रीच्या मुहुर्तावर सोनमने हे नवीन घर घेतलंय. सोनम आणि तिचा मुलगा वायू यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या ती मोठ्या पडद्यापासून दूर राहत लेकाचं संगोपन करण्यात व्यस्त आहे. नुकतंच तिने मुंबईतील मुखर्जी कुटुंबाच्या दुर्गा पूजेला हजेरी लावली. यावेळी राणी मुखर्जीसोबत गप्पा मारतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोनमने पुन्हा सिनेमात यावं यासाठी चाहते नेहमीच आग्रही असतात.  

Web Title: masakali girl Sonam Kapoor shifted to new house shared photos of her luxurious home