“करण जोहर कलाकारांचा आदर करतो”, क्षिती जोगला दिग्दर्शकाचं कौतुक, म्हणाली, “शूटिंगवेळी सेटवर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 13:18 IST2023-08-04T13:18:03+5:302023-08-04T13:18:31+5:30

क्षिती जोगने केलं करण जोहरचं कौतुक, म्हणाली, "तो कलाकारांवर..."

marathi actress Kshiti Jog praises director karan johar for rocky aur rani ki prem kahani | “करण जोहर कलाकारांचा आदर करतो”, क्षिती जोगला दिग्दर्शकाचं कौतुक, म्हणाली, “शूटिंगवेळी सेटवर...”

“करण जोहर कलाकारांचा आदर करतो”, क्षिती जोगला दिग्दर्शकाचं कौतुक, म्हणाली, “शूटिंगवेळी सेटवर...”

‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या बॉलिवूड चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगही करण जोहरच्या या चित्रपटात झळकली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’मधील क्षितीच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाची सक्सेस पार्टी पार पाडली. या पार्टीत क्षितीने करण जोहरबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला.

“करण जोहर कलाकारांच्या सांगण्यावरुन कधीकधी चित्रपटातील संवाद, सीन्स आणि ते शूट करण्याचा अँगलही बदलतो. आपण असं करुन बघूया का, या कलाकारांनी दिलेल्या सल्ल्यासाठी शूटिंग सुरू असताना सेटवर बदल करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांत काम केलं आहे. पण, करण जोहर हा नेहमी सहकार्य करण्यासाठी तयार असलेला, कलाकारांवर प्रेम करणारा दिग्दर्शक आहे. तो कलाकारांचा आदर करतो,” असं म्हणत क्षिती जोगने करण जोहरचं कौतुक केलं आहे.

“मी माझ्या आईसाठी अंतवस्त्र खरेदी करतो”, करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला...

क्षिती जोगने अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. त्याबरोबरच साराभाई वर्सेस साराभाई, ये रिश्ता क्या कहलाता है, घर की लक्ष्मी बेटियां या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली होती. आता ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातून तिने नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनीलने खरेदी केली मर्सिडीज कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने सात दिवसांत ७० कोटींची कमाई केली आहे. रणवीर, आलिया आणि क्षितीबरोबर या चित्रपटात जया बच्चन, धर्मेद्र, शबाना आझमी या कलाकरांची तगडी फौज असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून तो पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांत गर्दी करत आहेत.

 

 

Web Title: marathi actress Kshiti Jog praises director karan johar for rocky aur rani ki prem kahani