पतीच्या निधनानंतर स्विमिंग पूलमध्ये मित्रासोबत दिसली मंदिरा बेदी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 18:38 IST2022-05-04T18:37:29+5:302022-05-04T18:38:02+5:30

Mandira bedi: मंदिराने अलिकडेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. यात एका फोटोमध्ये तिच्यासोबत आदित्य मोटवानी दिसत असून त्यांचा हा फोटो स्विमिंगपूलमधील आहे.

mandira bedi trolled for bikini photo on friends birthday in thailand | पतीच्या निधनानंतर स्विमिंग पूलमध्ये मित्रासोबत दिसली मंदिरा बेदी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

पतीच्या निधनानंतर स्विमिंग पूलमध्ये मित्रासोबत दिसली मंदिरा बेदी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी अनेकदा अभिनयाव्यतिरिक्त तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत येत असते. मध्यंतरी तिच्या पतीच्या राज कौशलच्या निधनानंतर ती चांगलीच प्रकाशझोतात आली होती. पतीच्या निधनानंतर मंदिरा प्रचंड खचून गेली होती. मात्र, आता हळूहळू ती या दु:खातून सावरत आहे. त्यामुळे आता तिने पुन्हा मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवण्यास सुरुवात केली आहे. यामध्येच सध्या मंदिराचा आणि तिच्या मित्राचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

सध्या मंदिरा थायलंडमध्ये तिच्या जवळच्या मित्राच्या बर्थ डेच्या सेलिब्रेशनसाठी गेली आहे. यावेळी तिचे काही जवळचे मित्रमैत्रिणीही तिच्यासोबत असल्याचं पाहायला मिळतं. या व्हेकेशनमधील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र, हे फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मंदिराने अलिकडेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. यात एका फोटोमध्ये तिच्यासोबत आदित्य मोटवानी दिसत असून त्यांचा हा फोटो स्विमिंगपूलमधील आहे. या फोटोमध्ये मंदिरा आणि आदित्य प्रचंड क्लोज असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आदि. हा फोटो सारंकाही सांगून जातो. तू माझ्यासाठी काय आहे, आपण दोघं एकमेकांना कधीपासून ओळखतो. आपलं नातं काय आहे आणि माझा तुझ्यावर किती विश्वास आहे. खूप प्रेम. कायम यश आणि आनंद तुला मिळत राहो. १७ वर्षांपासून माझा जवळचा मित्र असलेल्या माझ्या दोस्ता", असं कॅप्शन देत मंदिराने आदित्यला विश केलं आहे.

दरम्यान, हा फोटो पाहिल्यावर ट्रोलर्सने मंदिराला खडे बोल सुनावले. 'हा कोण आहे? तुझ्या नवऱ्याचं तर निधन झालं ना?', असं एका युजरने म्हटलं. तर, अन्य काही जणांनी अशाच कमेंट करण्यास सुरुवात केली.ज्यामुळे मंदिराने कमेंट सेक्शन ऑफ केलं.
 

Web Title: mandira bedi trolled for bikini photo on friends birthday in thailand