बोल्डनेसमुळे गाजलेल्या ममता कुलकर्णीला आता ओळखणंही झालं कठिण, बघा लेटेस्ट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 18:29 IST2022-06-10T18:26:27+5:302022-06-10T18:29:03+5:30
Mamta Kulkarni : रिपोर्ट्सनुसार ममता कुलकर्णीने सिने इंडस्ट्री सोडून तिने ड्रग माफिया विक्की गोस्वामीसोबत लग्न केलं आणि देश सोडला. विक्कीमुळे ती चौकशीच्या घेऱ्यातही आली होती.

बोल्डनेसमुळे गाजलेल्या ममता कुलकर्णीला आता ओळखणंही झालं कठिण, बघा लेटेस्ट फोटो
Mamta Kulkarni : आपल्या बोल्डनेस आणि सौंदर्यामुळे ममता कुलकर्णी एकेकाळच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामिल होती. अनेक सिनेमातील आपल्या अदाकारीने तिने अनेकांना मोहित केलं होतं. पण नंतर ती यशाच्या शिखरावर असताना अचानक रूपेरी पडद्यावरून गायब झाली. ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाल्याने तिच्या फॅन्सना मोठा धक्का बसला होता. अनेक वर्षांनी तिचे लेटेस्ट फोटो समोर आले. यावेळी तिचा चेहरा इतका बदलला होता की, तिला ओळखणंही अवघड झालं. रिपोर्ट्सनुसार सिने इंडस्ट्री सोडून तिने ड्रग माफिया विक्की गोस्वामीसोबत लग्न केलं आणि देश सोडला. विक्कीमुळे ती चौकशीच्या घेऱ्यातही आली होती.
ममता कुलकर्णीचा जन्म 20 एप्रिल 1972 ला एका मराठी परिवारात झाला होता. 90च्या दशकात ती सैफ अली खान सोबत आशिक आवारा, क्रांतिविर, सलमान खानसोबत करण अर्जुन, सबसे बडा खिलाडीमध्ये अक्षयसोबत दिसली होती. तिने अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं. तिचे जास्तीत जास्त रोल हे ग्लॅमरस होते. तिची गाणी आणि डान्सही फेमस होता. तेव्हाची ती सर्वात बोल्ड अभिनेत्री मानली जात होती.
ममता कुलकर्णीचे स्टारडस्ट मॅगझिनमध्ये प्रकाशित फोटोंनी तर धमाका केला होता. त्यावेळी ती बोल्ड फोटोशूट करायला अजिबात घाबरत नव्हती. आता ममता कुठे आहे आणि काय करते याबाबत तर जास्त माहिती नाही. पण इन्स्टाग्रामवर तिच्या नावाने अकाउंट आहे. ज्यावर तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडीओ आहेत.