ममता कुलकर्णीने दिला 'महामंडलेश्वर' पदाचा राजीनामा; म्हणाली, "मी ग्लॅमरचं जग सोडलं तरी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:41 IST2025-02-10T16:40:54+5:302025-02-10T16:41:31+5:30
ममता कुलकर्णी व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

ममता कुलकर्णीने दिला 'महामंडलेश्वर' पदाचा राजीनामा; म्हणाली, "मी ग्लॅमरचं जग सोडलं तरी..."
९० च्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) सध्या चर्चेत आली आहे. २५ वर्षांनी ती भारतात परतली आणि थेट महाकुंभमेळ्याला तिने हजेरी लावली. इतकंच नाही तर तिला किन्नर आखाड्याने महामंडलेश्वर ही पदवीही दिली. मात्र यानंतर मोठा वाद झाला. ममताला ही पदवी दिल्याने अनेक साधु महंत नाराज झाले. आता ममताने महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. तिने व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे.
ममता कुलकर्णी व्हिडिओ शेअर करत म्हणाली, "मी महामंडलेश्वर, यमाई ममता नंदगिरी या पदाचा राजीनामा देत आहे. आज किन्नर आखाड्यात आणि इतरांमध्ये मला महामंडलेश्वर उपाधी देण्यावरुन जो वाद होत आहे. मी एक साध्वी होते आणि साध्वीच राहीन. महामंडलेश्वर हा सम्मान मला मिळाला होता तो त्यांना मिळतो ज्याने तपस्या केली असते. मी तपस्या केली, बॉलिवूड, ग्लॅमर सगळं सोडलं. पण तरी काहींना माझ्या या पदावरुन आपत्ती आहे. म्हणून मी हे पद सोडत आहे. महामंडलेश्वर होणं म्हणजे इतरांना आपल्याकडील ज्ञान देणं ते मी करतच राहीन."
ममता कुलकर्णी काही वर्षांपूर्वी २ हजार कोटी किंमतीच्या ड्रग्स केसमध्ये अडकली होती. तिच्याविरोधात अटकेचा वॉरंटही होता मात्र ती भारताबाहेर गेली. विकी गोस्वामी हा या केसमागचा सूत्रधार होता. ममताने विकीशी लग्नही केलं अशीही चर्चा होती. गेल्या वर्षीच पुराव्यांअभावी ममताला सर्व आरोपांतून मुक्त करण्यात आलं. यानंतर ती आता भारतात परतली आहे.