Mohanlal's Ram Plot Leaked: मोहनलाल यांच्या 'राम' सिनेमाचा प्लॉट लीक, नेटकरी म्हणाले, 'ही तर पठाणचीच कथा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 13:05 IST2023-02-02T13:01:58+5:302023-02-02T13:05:55+5:30
राम चित्रपटात मोहनलाल 'रॉ' फील्ड ऑफिसरच्या भूमिकेत आहे. दोन भागात हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Mohanlal's Ram Plot Leaked: मोहनलाल यांच्या 'राम' सिनेमाचा प्लॉट लीक, नेटकरी म्हणाले, 'ही तर पठाणचीच कथा'
Mohanlal's Ram Plot Leaked: 'दृश्यम' फेम मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा आगामी सिनेमा 'राम' चा प्लॉट (Plot) सोशल मीडियावर लीक झाला आहे. मोहनलाल पुन्हा एकदा दृश्यम दिग्दर्शक जीतू जोसेफ (Jeetu Joseph) यांच्यासोबत 'राम' या चित्रपटात काम करत आहेत. 'राम' ही स्पाय थ्रिलर फिल्म असणार आहे. मात्र आता राम ची कथा पठाणशी मिळतीजुळती असल्याचा संशय नेटकऱ्यांना आला आहे. यावरुन सध्या ट्विटरातींची चर्चा सुरु आहे.
राम चित्रपटात मोहनलाल 'रॉ' फील्ड ऑफिसरच्या भूमिकेत आहे. दोन भागात हा चित्रपट रिलीज होणार आहे. राम सिनेमाचा प्लॉट इंटरनेटवर लीक झाला आणि ट्विटर युझर्स या चित्रपटाची तुलना शाहरुखच्या 'पठाण'शी करत आहेत. नुकतेच एका ट्वविटर हॅंडलवरुन मोहनलाल आणि जीतू जोसेफ यांच्या स्पाय थ्रिलर फिल्म 'राम' चा सारांश लिहिला, यात लिहिले होते की, 'या चित्रपटात एक एजंट आणि संघटन पूर्व जासूसला शोधण्यात ट्रॅक करण्यासाठी रॉ च्या प्रयत्नांवर केंद्रित आहे. राम मोहन हा एक जासूस आहे जो फरार असतो. 'बेल' या आतंकवादी संघटनेला नष्ट करण्यासाठी आर्मीला त्याच्या मानसिक आणि शारिरीक क्षमतांची गरज असते. या आतंकवादी संघटनेकडे nuclear weapons असतात.'
#RAM basic plot..!#Mohanlal & #JeethuJoseph again.. pic.twitter.com/akPgaZdSEQ
— AB George (@AbGeorge_) January 31, 2023
हा प्लॉट वाचल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी पठाण २.O अशी कमेंट केली आहे. तर काही जणांनी कमेंट केली की, 'अनेकांना ही पठाण सारखी कहाणी वाटत आहे मात्र प्रत्येक मिशन इम्पॉसिबल फिल्मचा प्लॉट एकसारखाच असतो.'