'मर्डर' मधील बोल्ड दृश्यांवर मल्लिका शेरावत म्हणाली, "महेश भटच्या सेटवर सर्व मुली..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 10:58 IST2024-10-11T10:56:58+5:302024-10-11T10:58:00+5:30

'मर्डर' मधले ते सीन्स शूट करताना थोडं विचित्र वाटलं...

Mallika Sherawat talks about her bold scenes with Imran Hashmi in murder directed by mahesh bhatt | 'मर्डर' मधील बोल्ड दृश्यांवर मल्लिका शेरावत म्हणाली, "महेश भटच्या सेटवर सर्व मुली..."

'मर्डर' मधील बोल्ड दृश्यांवर मल्लिका शेरावत म्हणाली, "महेश भटच्या सेटवर सर्व मुली..."

मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) बॉलिवूडमध्ये 'मर्डर' (Murder) सिनेमामुळे चर्चेत आली होती. या सिनेमातील तिचे इम्रान हाश्मीसोबतचे (Imran Hashmi) इंटिमेट सीन्स चर्चेत होते. आजही याच सीन्सची चर्चा असते. महेश भट यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. मल्लिका शेरावत बरेच वर्षांनी पुन्हा हिंदी सिनेमात दिसत आहे. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरीच्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' मध्ये तिने भूमिका साकारली आहे. नुकतंच मल्लिकाने तिच्या 'मर्डर' मधील दृश्यांबाबत भाष्य केलं आहे.

मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मीची जोडी 'मर्डर' मुळे गाजली. एका मुलाखतीत मल्लिकाने मर्डर मधील सीन्स कसे चित्रीत झाले तेव्हा  अनकंफर्टेंबल वाटलं का याचं उत्तर दिलं. ती म्हणाली, "महेश भट यांच्या सेटवर नेहमीच सुरक्षित वाटतं. मर्डरच्या वेळी सेटवर खूप सकारात्मक वातावरण बनवण्यात आलं होतं. महेश भट आणि इम्रान हाश्मी दोघांनीही मला खूप कंफर्टेंबल केलं. सेटवर युनिटचे इतरही लोक असल्याने थोडं विचित्र वाटतं. पण इमरान खूप चांगला आहे त्याने मला खूप मदत केली.  महेश भट यांच्या सेटवर सगळ्याच मुली सुरक्षित आहेत. "


'मर्डर' २००४ साली रिलीज झाला होता. नंतर मल्लिकाला इंडस्ट्रीक अनेकदा कास्टिंग काऊचला सामोरं जावं लागलं होतं. यामुळे ती हळूहळू इंडस्ट्रीपासून दुरावली. अनेक वर्ष ती परदेशात स्थायिक होती. मात्र आता पुन्हा ती हिंदी सिनेमात झळकत आहे त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 

Web Title: Mallika Sherawat talks about her bold scenes with Imran Hashmi in murder directed by mahesh bhatt