VIDEO : मल्लिका शेरावतने बिकीनी घालून केला हॉट वर्कआउट, बोल्ड अंदाज पाहून अवाक् झाले फॅन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 15:51 IST2022-01-29T15:50:30+5:302022-01-29T15:51:45+5:30
Mallika Sherawat Workout in Bikini : व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, मल्लिका शेरावत एक्सरसाइज करताना दिसत आहे. यावेळी ती बिकीनीमध्ये आहे. हा तिचा बोल्ड अंदाज तिच्या फॅन्सना चांगलाच आवडला.

VIDEO : मल्लिका शेरावतने बिकीनी घालून केला हॉट वर्कआउट, बोल्ड अंदाज पाहून अवाक् झाले फॅन्स
मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) ही बॉलिवूडच्या सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती भलेही आजकाल सिनेमापासून दूर आहे. पण सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती फॅन्सच्या हृदयाचे ठोके चुकवत आहे. तिने तिचा एक एक्सरसाइजचा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, मल्लिका शेरावत एक्सरसाइज करताना दिसत आहे. यावेळी ती बिकीनीमध्ये आहे. हा तिचा बोल्ड अंदाज तिच्या फॅन्सना चांगलाच आवडला. मल्लिकाने तिचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय.
मल्लिका शेरावत ही फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे. ती स्वत:ला फीट ठेवण्यासाठी रोज वर्कआउट करते आणि हेल्दी डाएट फॉलो करते. त्यामुळेच इतक्या वर्षांनीही ती आधीसारखी हॉट दिसते. मल्लिकाचे फॅन्स तिच्या या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत. कुणी तिच्या फिटनेसचं कौतुक करत आहेत तर कुणी तिच्या बोल्ड अदांचं.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर मल्लिका अखेरची २०१९ मध्ये आलेल्या 'बू सबकी फटेगी'मध्ये दिसली होती. हा एक हॉरर-कॉमेडी सिनेमा होता. याचं दिग्दर्शन फरहाद सामजीने केलं होतं. रिपोर्ट्सनुसार, मल्लिका लवकरच साऊथ फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू करणार आहे. ती पीरियड ड्रामा सिनेमा 'नागमति'मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा हिंदीसोबतच तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये रिलीज होईल.