डायरेक्टर मला रात्री-बेरात्री कॉल करायला सांगायचे...! मल्लिका शेरावतचा धक्कादायक खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 14:20 IST2018-07-04T14:19:53+5:302018-07-04T14:20:49+5:30

गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊचवर देशभरात मोठी चर्चा रंगते आहे. आजपर्यंत अनेक नट्या मोठ्या धाडसाने कास्टींग काऊच विरोधात उभ्या ठाकल्या. आता यात मल्लिका शेरावत हिचेही नाव सामील झाले आहे.

mallika sherawat on casting couch; directors asked me to call 3O clock at night | डायरेक्टर मला रात्री-बेरात्री कॉल करायला सांगायचे...! मल्लिका शेरावतचा धक्कादायक खुलासा!!

डायरेक्टर मला रात्री-बेरात्री कॉल करायला सांगायचे...! मल्लिका शेरावतचा धक्कादायक खुलासा!!

गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊचवर देशभरात मोठी चर्चा रंगते आहे. आजपर्यंत अनेक कलाकार आणि मॉडेल्सनी कास्टींग काऊचच्या बळी पडल्याचे आरोप केलेत. अनेक नट्या मोठ्या धाडसाने कास्टींग काऊच विरोधात उभ्या ठाकल्या. आता यात मल्लिका शेरावत हिचेही नाव सामील झाले आहे. २००४ मध्ये ‘मर्डर’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये खळबळ माजवणारी मल्लिका एक अतिशय बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. याच बोल्ड अभिनेत्री ताज्या मुलाखतीत बॉलिवूडमधीलकास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. चित्रपटात बोल्ड भूमिका केल्या की, अख्खी इंडस्ट्री तुमच्याबद्दल एका विशिष्ट नजरेतून पाहायला लागते. स्क्रीनवर किसींग सीन दिला की, खऱ्या आयुष्यातही तुम्ही वाट्टेल ते करायला तयार असता, असे इथले बहुतेक लोक समजतात. माझ्याबद्दलही हेच झाले, असे मल्लिका या मुलाखतीत म्हणाली.


मला अनेक प्रोजेक्टमधून बाहेर काढले गेले. कारण अनेक दिग्दर्शक , निर्मात्यांना माझ्याकडून वेगळेच काही अपेक्षित होते. तू त्या हिरोसोबत इंटिमेट सीन देतेस, मग माझ्यासोबत का नाही? तू स्क्रिनवर करू शकतेस मग खासगीत का नाही? असे प्रश्न मला विचारले जायचे. केवळ मलाचं नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना यातून जावे लागत़. अनेकांनी मला रात्री-बेरात्री फोन केलेत. पण मी या अशा मागण्यांना बळी पडले नाही. माझा स्वत:चा आत्मसन्मान होता. मला तो कुठल्याही स्थितीत गहाण ठेवायचा नव्हता. मला पहाटे ३ वाजता फोन कर, असे अनेकदा मला डायरेक्टर्स सांगायचे. मी त्यावेळी प्रचंड घाबरायचे. मी कुणाला याबद्दल सांगितले तर त्याचे परिणाम काय होतील, अशी भीती मला वाटायची. कारण आपल्या समाजात जो बोलतो, त्यालाच लोक गुन्हेगार ठरवतात. त्यामुळे मी कायम यावर बोलणे टाळले, असे मल्लिका म्हणाली.

मल्लिका शेरावत दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर्टी पॉलिटीक्स’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. यानंतर २०१६ मध्ये ‘टाइम राइडर्स’ या चीनी चित्रपटात ती झळकली होती.   ‘मर्डर’,‘किस किस की किस्मत’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’, ‘गुरू’अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत दिसलेली आहे. ‘द मिथ’ या विदेशी चित्रपटात जॅकी चॅनसोबत तिने काम केलेय.

 

Web Title: mallika sherawat on casting couch; directors asked me to call 3O clock at night