'Mardan Girl' Mallika Sherawat gets to work in Bollywood! Now the basis of Bhojpuri !! | ​ ‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावतला बॉलिवूडमध्ये मिळेना काम! आता ‘भोजपुरी’चा आधार!!

‘मर्डर गर्ल’ नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत  हिचे बॉलिवूडमधले दिवस कदाचित संपलेत. होय, बॉलिवूडमध्ये आता मल्लिकाला कुणीही विचारेनासे झालेयं. कदाचित त्याचमुळे मल्लिकावर नाही ते करायची वेळ आली आहे. होय, बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याने पाहून मल्लिका भोजपुरी चित्रपटात काम करण्यासही राजी असल्याची बातमी आहे. सूत्रांचे मानाल तर, मल्लिका लवकरच एका भोजपुरी गाण्याचे शूटींग करणार असल्याची खबर आहे. अर्थात अद्याप या भोजपुरी चित्रपटाच्या नावाचा खुलासा झालेला नाही.म्हणजेच, बॉलिवूडमध्ये बोल्डनेसचा तडका लावल्यानंतर मल्लिका आता भोजपुरी चाहत्यांना आपल्या बोल्ड अदांनी रिझवणार आहे.  
अलीकडे एका मुलाखतीत मल्लिकाने याबाबतचे संकेत दिले होते. माझ्यासाठी भाषा नाही तर काम महत्त्वाचे आहे. मी स्वत:ला भाषेची मर्यादा घालू इच्छित नाही, असे ती म्हणाली होती.
 मल्लिका सध्या भारतात कमी अन् फ्रान्समध्येचं अधिक असते. पण तरिही तिच्याबद्दलच्या बातम्या भारतात चघळल्या जातात . मध्यंतरी मल्लिका आणि तिचा फ्रेन्च बॉयफ्रेन्ड साइरिल आॅक्जेनफेन्स या दोघांना त्यांच्या पॅरिसच्या घरमालकाने घरातून हाकलून दिल्याची बातमी  कानावर आली होती.  घरमालकाच्या दाव्यानुसार, मल्लिकाने फक्त एकदाच 2715 यूरोचे भाडे दिले होते. त्यानंतर तिने एकही पैसा दिला नाही.  अर्थात मल्लिकाने या बातम्या निराधार असल्याचे म्हटले होते. माझे पॅरिसमध्ये ना घर आहे ना मी तिथे भाड्याने राहते. मी लॉस एंजिल्समध्ये राहत होती आणि गेल्या आठ महिन्यांपासून भारतात आहे. तेव्हा नाहक अफवा पसरवू नका, असा खुलासा मल्लिकाने केला होता. मल्लिका दीर्घकाळापासून साइरिलसोबत राहत आहेत. या दोघांनीही सीक्रेट मॅरेज केल्याची चर्चा आहे.  

ALSO READ : ​मल्लिका शेरावत व तिचा बॉयफ्रेन्ड आलेत रस्त्यावर ? भाडे न दिल्याने घरमालकाने हाकलले??

मल्लिका शेरावत दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर्टी पॉलिटीक्स’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. यानंतर २०१६ मध्ये ‘टाइम राइडर्स’ या चीनी चित्रपटात ती झळकली होती.   ‘मर्डर’,‘किस किस की किस्मत’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’, ‘गुरू’अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत दिसलेली आहे. ‘द मिथ’ या विदेशी चित्रपटात जॅकी चॅनसोबत तिने काम केलेय.
Web Title: 'Mardan Girl' Mallika Sherawat gets to work in Bollywood! Now the basis of Bhojpuri !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.