मलायका अरोरा पुन्हा एकदा बांधणार लग्नगाठ! अर्जुन कपूरसोबत थाटणार संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 16:19 IST2023-04-08T16:18:14+5:302023-04-08T16:19:06+5:30
Malaika Arora And Arjun Kapoor : अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर २०१७ पासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरला रिलेशनशीपमध्ये आहेत.

मलायका अरोरा पुन्हा एकदा बांधणार लग्नगाठ! अर्जुन कपूरसोबत थाटणार संसार
अभिनेता अरबाज खान(Arbaaz Khan)ला घटस्फोट दिल्यानंतर २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) अभिनेता अर्जुन कपूर(Arjun Kapoor)सोबत रिलेशनशीपमध्ये आली. वयाच्या अंतरामुळे त्यांच्या नात्याचीही खूप चर्चा झाली. मलायका ४९ आणि अर्जुन कपूर ३७ वर्षांचा आहे. अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या अफेअरला बरीच वर्षे झाली आहेत. अनेकदा दोघंही एकत्र दिसतात आणि त्यांच्या प्रेमावर मोकळेपणाने चर्चा करतात. आता प्रमोशन दरम्यान मलायकाने अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाबाबत मौन सोडले आहे.
मलायका अरोरा ब्राइड्स टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, होय आम्ही लग्नाचा विचार करतो आहे. काही लोक तर आम्हाला स्वार्थी समजतात पण ते एकमेकांवरचे प्रेम असते. माझा परंपरा आणि संस्थांवर विश्वास आहे. लग्न आणि प्रेमाबद्दल बोलताना मलायका अरोरा पुढे म्हणाली की, माझा प्रेम आणि सौहार्द या दोन्हींवर विश्वास आहे. लग्न कधी होईल हे सांगता येत नाही. कारण आयुष्याबद्दल फारसे नियोजन नसावे असे माझे मत आहे. आयुष्याबद्दल खूप नियोजन केल्याने आयुष्यातील मजा खराब होते.
तिच्यापेक्षा ११ वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करताना मलायका म्हणाली की, तो त्याच्या वयाच्या बाबतीत खूप शहाणा आहे. तो खूप शांत आणि कणखर मनाचा माणूस आहे. खुल्या विचारांसोबतच तो खूप काळजीही घेतो. पुढे ती म्हणाली, पुढील ३० वर्षे ती हेच काम करत राहील. तिला घरी बसायचे नाही. मला प्रवास करायचे आहे. मला स्थिरावायचे आहे. मला आमचे नाते कायमचे जपायचे आहे. कारण मला वाटते की आम्ही दोघंही त्यासाठी तयार आहोत.