२१ वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत जोडलं नाव, डेटिंगच्या अफवांवर 'अशी' होती मलायकाच्या लेकाची रिअ‍ॅक्शन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:21 IST2026-03-27T11:15:57+5:302026-03-27T11:21:39+5:30

वयाने लहान असलेल्या अभिनेत्यासोबत दिसलेली मलायका, डेटिंगच्या अफवांवर म्हणाली- "मला कोणासोबत राहायचं असेल,तर…"

malaika arora shut down dating rumours with saurabh bedi talk about son arhaan khan reaction | २१ वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत जोडलं नाव, डेटिंगच्या अफवांवर 'अशी' होती मलायकाच्या लेकाची रिअ‍ॅक्शन, म्हणाली...

२१ वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत जोडलं नाव, डेटिंगच्या अफवांवर 'अशी' होती मलायकाच्या लेकाची रिअ‍ॅक्शन, म्हणाली...

Malaika Arora:बॉलिवूड अभिनेत्री डान्सर आणि मॉडेल मलायका अरोरा कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.अभिनेत्री सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असल्याची बघायला मिळते. अलिकडेच मलायका एका कॉन्सर्टमध्ये मिस्ट्री बॉयसोबत स्पॉट झाल्याने चांगलीच चर्चेत आली होती.  अरबाज खानसोबत घटस्फोट आणि नंतर अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती आयुष्यात पुढे गेल्याचं पाहायला मिळालं.मात्र, अभिनेता सोराब बेदीसोबत रोमँटिक पोज देताना दिसली. यावरुन मलायका आणि सोराब एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली. या दोघांच्या वयात साधारण २१ वर्षांचं अंतर आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तिच्या डेटिंगच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरू लागल्या. मलायकाने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अलिकडेच 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सोराब बेदीने मलायकासोबतच्या अफेअरच्या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं होतं. शिवाय जाहीरपणे त्याने नाराजी व्यक्त केली. अशातच आता कर्ली टेल्सशी बोलताना मलायका म्हणाली,"आता हे सगळं जास्तच होतंय.पण, मी या गोष्टींकडे विनोद म्हणून पाहते. बऱ्याचदा मी आणि अरहान या गोष्टींवर हसतो. या गोष्टी काही माझ्या हातात नाहीत. जे व्हायचं ते होणारच आहे. सध्या माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्यानंतर माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे  आणि मी खुश आहे. जोडीदारच्या बाबतीत बोलायचं झालं तर, ते सगळं छानच असतं. जर मला कोणासोबत राहायचे असेल, तर ते मी माझ्या अटींवरच राहीन." असं मलायकाने सांगितलं.  

सौरभ बेदी काय म्हणालेला?

'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने म्हटलेलं,"मलायका आणि माझं नाव जोडलं जाणं हे खूपच निराशाजनक आहे. आमच्यात फक्त चांगली मैत्री आहे. मॉडेलिंगच्या दिवसात माझ्या मेंटॉरने आमची मलायकाशी ओळख करुन दिली होती. नंतर आम्ही एकाच सोशल सर्कलचा भाग झालो. मलायकाला भेटलो, ती जिथे असायची त्या पार्टीही मी अटेंड केल्या आहेत. त्यामुळे आमच्यात मैत्री झाली."

५२ वर्षीय मलायका अरोरा फिटनेस फ्रिक आहे. तिचं लग्न अरबाज खानसोबत झाले होते, पण १९ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेत नात्याला पूर्णविराम दिला.

Web Title : मलायका का बेटा छोटी उम्र के अभिनेता के साथ डेटिंग अफवाहों पर प्रतिक्रिया करता है।

Web Summary : मलाइका अरोड़ा ने सोहराब बेदी के साथ डेटिंग की अफवाहों को संबोधित किया, उनकी दोस्ती को स्पष्ट किया। वह जीवन का आनंद लेने और व्यक्तिगत खुशी को प्राथमिकता देने पर जोर देती हैं, और हास्य के साथ अटकलों को खारिज करती हैं। सोहराब ने भी अफवाहों का खंडन किया।

Web Title : Malaika's son reacts to dating rumors with younger actor.

Web Summary : Malaika Arora addresses dating rumors with Sohrab Bedi, clarifying their friendship. She emphasizes enjoying life and prioritizing personal happiness, dismissing speculation with humor. Sohrab also denied the rumors.