Malaika Arora Video : बोल्ड अॅंड ब्युटिफुल मलायका; थेट टेबलवर चढून दाखवल्या 'डान्स मूव्ह्ज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2022 05:36 PM2022-12-31T17:36:03+5:302022-12-31T17:37:25+5:30

'मूव्हिंग इन विथ मलायका' या मलायकाच्या शो मध्ये अनेक गोष्टींचा खुलासा होतोय. शोच्या एका क्लिपमध्ये मलायका थेट टेबलवर चढून डान्स करत आहे.

malaika-arora-showed-dance-moves-by-standing-on-table-in-a-viral-clip-of-her-show-moving-in-with-malaika | Malaika Arora Video : बोल्ड अॅंड ब्युटिफुल मलायका; थेट टेबलवर चढून दाखवल्या 'डान्स मूव्ह्ज'

Malaika Arora Video : बोल्ड अॅंड ब्युटिफुल मलायका; थेट टेबलवर चढून दाखवल्या 'डान्स मूव्ह्ज'

googlenewsNext

Malaika Arora : 'मूव्हिंग इन विथ मलायका' या मलायकाच्या शो मध्ये अनेक गोष्टींचा खुलासा होतोय. मलायकाचा घटस्फोट, अर्जुन कपूरसोबतचे नाते, मुलगा अरहानसोबतचे नाते या सर्व गोष्टींबद्दल मलायका शो मध्ये बोलली आहे. आता नुकतेच मलायकाचा घटस्फोट होत असताना बहिण अमृता अरोरा कुठे होती याचा खुलासा झाला आहे. आता तर शोच्या एका क्लिपमध्ये मलायका थेट टेबलवर चढून डान्स करत आहे.

मलायका अरोरा प्रचंड फिट आहे. हे नेहमीच तिच्या फोटो, व्हिडिओमधून दिसून येत असते. आता तर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये ती थेट टेबलवर चढली आहे आणि डान्स मूव्ह्ज दाखवत आहे. ते एक पब दिसत असून इतर लोकही आजूबाजूला बसलेले आहेत. तर मलायकाची बहिण अमृता अरोरा तिच्यासोबत आहे. सर्वांसाठी मलायका थोड्या डान्स मूव्ह्ज दाखवते आणि नेतर सगळ्यांना थॅंक्यू म्हणते. ४७ व्या वर्षीही ती कमालीची फिट अॅंड फाईन दिसत आहे.

मूव्हिंग इन विथ मलायका या शोमधून मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना अगदीच जवळून जाणून घेता आले. मलायकाने आजपर्यंत झालेल्या ट्रोलिंगलाही या शोच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

Web Title: malaika-arora-showed-dance-moves-by-standing-on-table-in-a-viral-clip-of-her-show-moving-in-with-malaika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.