मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:42 IST2025-10-09T10:40:50+5:302025-10-09T10:42:15+5:30
लेकाच्या 'बिग ब्रदर' पोस्टवरही मलायकाची कमेंट

मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा ८ वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला. दोन वर्षांपूर्वी अरबाजने दुसरं लग्न केलं. नुकतंच त्याचा दुसरी पत्नी शूरापासून एक गोंडस मुलगी झाली. तर मलायकापासून त्याला २२ वर्षांचा अरहान हा मुलगा आहे. एकीकडे खान कुटुंबात चिमुकलीच्या आगमनाने आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे मलायका सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर करत आहे. मलायकाला नक्की झालंय तरी काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
अरबाज खानची दुसरी पत्नी शूरा खानचं काही दिवसांपूर्वी बेबी श़ॉवर झालं. तेव्हा मलायकाने 'प्यार मे कोई सौदेबाजी नही होती' असा एक व्हिडिओ शेअर केला होता. तर चार दिवसांपूर्वी अरबाज खानला मुलगी झाली. कालच अरबाज आपल्या चिमुकलीला छातीशी धरुन गाडीत बसला. रुग्णालयाबाहेरचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तसंच त्यांनी लेकीचं नाव 'सिपारा खान' असं रिव्हील केलं. अरबाज आणि शूरावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना मलायकाने रात्री स्टोरी शेअर केली. यात संपूर्ण ब्लॅक फोटोवर ती फक्त तीन हॉर्ट इमोजी शेअर केले. अशा पद्धतीने तिने अरबाजला शुभेच्छा दिल्याची चर्चा आहे.
तर दुसरीकडे तिचा मुलगा अरहान खानने शूराच्या बेबी शॉवरचे फोटो पोस्ट केले. तसंच 'बिग ब्रदर ड्युटी बूटकॅम्प' असं कॅप्शन दिलं. या फोटोंवर मलायकाने 'लास्ट फोटो आणि तीन हार्ट इमोजी' शेअर केले. यावरूनही बरीच चर्चा झाली.
मलायका अरोरा आणि अरबाजचा २०१७ सालीच घटस्फोट झाला. नंतर मलायका ११ वर्ष लहान अर्जुन कपूरला डेट करत होती. दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. सध्या मलायका सिंगल आयुष्य जगत आहे.